पुणे शहरातील नागरिकाची आजच्या दिवसाची सुरुवात चंदननगर येथील गोळीबाराच्या घटनेने झाली. चंदननगर परिसरातील आनंद गृहरचना सोसायटीत सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. खानवळ चालविणार्‍या एकता ब्रिजेश भाटी (वय.३८) यांच्या वर अनोळखी दोन व्यक्तीनी पिस्तूल मधून गोळ्या झाडल्या. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती चंदननगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून मारेकऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

या घटनेतील आरोपीच्या शोधासाठी शहरातील अनेक भागात पोलिसाची पथके रवाना करण्यात आली. या घटनेतील आरोपीचा शोध सुरू असताना. येवलेवाडी येथील गणेश ज्वलर्सवर दुपारी पावणे दोनच्या सुमारास दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चार व्यक्तीनी केलेल्या गोळीबारात दुकानातील कामगार जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती कोंढवा पोलिसाना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे पुणे शहरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. या दोन्ही घटनांमुळे शहरातील नागरिक सुरक्षित आहेत का यावर सोशल मीडिया प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली.

तर या दोन्ही घटना थांबत नाही तोवर चंदननगर येथील महिलेची हत्या करणारे आरोपी हे पुणे स्टेशन येथून झेलम एक्क्सप्रेसने जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पुणे स्टेशन येथे पाच च्या दरम्यान फ्लॅट फर्म क्रमांक 3 वर पोहचले. त्यावेळी दोन आरोपी रेल्वेमध्ये बसल्याचे त्यांना कळताच त्याना पकडताना दोन आरोपीं पैकी एकाने crim branch चे पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील दोन गोळ्या पोटात मध्ये लागल्या. यामुळे पवार खाली कोसळले. त्याच्या बरोबर असलेल्या पोलिसानी त्यातील एका आरोपीला जागेवर पकडले. तर दुसर्‍या आरोपी तेथून पळून गेला. तेथून काही अंतरावर त्याला देखील पकडले.

पोलिसांवर आरोपीनी गोळीबार केल्याची माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली आणि गजानन पवार यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पवार यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. तसेच रेल्वे स्थानकात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच शहरातील दिवसभरातील तिसरी गोळीबाराची घटना असल्याने सर्व सामान्य नागरिकांपासून आता पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.