पुण्यात दुचाकी जाळण्याच्या घटना काही केल्या थांबण्यास तयार नाहीत. येथील कोथरूड भागातील किष्किंदा नगरमध्ये मंगळवारी रात्री आठ दुचाकी जाळल्याची घटना समोर आली आहे. गेल्या महिन्याभरात पुण्यामध्ये घडलेले हे चौथे जळीतकांड आहे. किष्किंदा नगरमधील रहिवासी त्यांच्या दुचाकी एका मोकळ्या मैदानात पार्क करून ठेवतात.
पुण्यात पुन्हा दुचाकी जळीतकांड, ३३ वाहने भस्मसात 
या दुचाकींना काल रात्री दोन-अडीचच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. हा परिसर संपूर्णपणे मोकळा असल्याने ही आग अन्य कोणत्या कारणामुळे लागली नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात दुचाकी जाळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांनी अद्यापपर्यंत यश आलेले नाहीत.
कात्रजमधील दुचाकी जळीतकांडाच्या आरोपीला अटक
पार्किंगच्या भांडणातून गाडय़ांची ‘होळी’!