News Flash

दीड वर्षांचा चिमुकला बेडरुममध्ये अडकला; अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुटका

अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या काही मिनिटांत या चिमुकल्याची सुखरूप सुटका केली.

बेडरुममध्ये अडकलेल्या चिमुकल्याची अग्निशामन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली.

पिंपरी-चिंचवड परिसरातील वाकड येथील एका फ्लॅटमधील बेडरूममध्ये दीड वर्षाचा मुलगा खेळता खेळता अडकला होता. त्यामुळे या चिमुकल्याची आई घाबरून गेली होती. परंतू, अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या काही मिनिटांत या चिमुकल्याची सुखरूप सुटका केली. या मुलाची आई घरात काम करीत असताना हा प्रकार घडला. सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

सुत्रांच्या माहितीनुसार, नविस नगीना (वय १.५ वर्षे, रा. कस्पटे वस्ती, धनराज पार्क, तिसरा मजला, वाकड) असे खोलीत अडकलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. नवीसची आई घरकामात व्यस्त असताना तो खेळता खेळता बेडरूममध्ये गेला आणि दरवाजाची कडी लावून घेतली. यानंतर त्याला बाहेर पडता येईना त्यामुळे तो मोठमोठ्याने रडू लागला. त्याच्या आईने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतू तो आतून बंद असल्याने उघडला जात नव्हता.

त्यानंतर वसाहतीतील नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती दिली. आठ जणांच्या टीमने या तक्रारीची दखल घेत तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी तिसऱ्या मजल्यावर शिडीच्या साहाय्याने खडकीपर्यंत पोहचत काठीने कडी काढली आणि चिमुकल्याची सुखरूप सुटका केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही मिनिटात आई आणि मुलाची भेट घडवून आणली.

या बचाव कार्यात लिडिंग फायरमन भगवान यमगर, प्रतीक कांबळे, विवेक खांदेवाड, महेंद्र पाठक, रुपेश वानखेडे, अक्षय पाटील, रजनीश भावसर, वाहन चालक संदीप जगताप यांनी सहभाग घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 9:40 pm

Web Title: one and a half year old boy gets stuck in bedroom fire brigade personnel released him
Next Stories
1 छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप निंबाळकर यांची आत्महत्या
2 गोवत्सपूजनाने झगमगत्या दीपोत्सवाचा प्रारंभ
3 भीमा-कोरेगांव हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगाकडे पोलिसांचे प्रतिज्ञापत्र
Just Now!
X