News Flash

एक लिंबू पाच रुपयांना!

उन्हाळा सुरू झाल्याने लिंबांची आवक कमी झाली आहे.

वाढत्या उन्हामुळे लिंबे महाग; आवकही कमी

पुणे : उन्हाचा तडाख्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लिंबांच्या मागणीत वाढ झाली आहे. एरवी घाऊक बाजारात लिंबांच्या एका गोणीची विक्री १०० ते १४० रुपये दराने केली जाते. तर सध्या मार्केट यार्डातील घाऊक फळबाजारात लिंबांची एका गोणीची (आकारमानानुसार ३५० ते ५५० लिंबे) विक्री एक ते दीड हजार रुपये या दराने केली जात आहे.

किरकोळ ग्राहकांकडून लिंबांच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे उन्हाळ्यात लिंबांचे दर तेजीत असतात, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील लिंबांचे व्यापारी रोहन जाधव यांनी सांगितले. गेल्या रविवारी (२८ मार्च) लिंबांच्या एका गोणीचा दर ४०० ते ११०० रुपये असा होता. सध्या सोलापूर, नगर जिल्ह्यातून लिंबांची आवक होत आहे. हंगामात दररोज चार ते पाच हजार गोण्यांमधून लिंबांची आवक होते. सध्या उन्हाळा सुरू झाल्याने लिंबांची आवक कमी झाली आहे. एक ते दीड हजार गोणी लिंबांची आवक होत आहे. उन्हाळा संपेपर्यंत लिंबांचे दर तेजीत राहणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

उपाहारगृहे बंद आहेत. त्यामुळे लिंबांना मागणी कमी आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत लिंबांची आवक कमी होत असल्याने लिंबांच्या दरात वाढ झाली आहे. एका गोणीत आकारमानानुसार साडेतीनशे ते साडेपाचशे लिंबे बसतात. उन्हाळा संपेपर्यंत लिंबांचे दर तेजीत राहतील.

– रोहन जाधव, लिंबांचे व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:02 am

Web Title: one lemon five rupees akp 94
Next Stories
1 शहरात दहशत करणाऱ्या दोन गुंड टोळ्यांना मोक्का
2 Coronavirus – पुण्यात दिवसभरात ४ हजार ७७ नवीन करोनाबाधित, ३६ रूग्णांचा मृत्यू
3 पुणे – करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांकडून सुधारित आदेश जारी
Just Now!
X