पुणे : नगर जिल्ह्य़ातील राशिन पसिसर तसेच सोलापूर जिल्ह्य़ातील काही भागांत यंदा पावसाने पाठ फिरवल्याने लिंबांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. पुरेसे पाणी न मिळाल्याने लिंबांचे उत्पादन कमी झाल्याने घाऊक बाजारात लिंबाची आवक कमी होत चालली आहे.  एरवी  किरकोळ बाजारात एक रुपयांना मिळणाऱ्या लिंबाची विक्री आता पाच रुपये एक नग या दराने केली जात आहे.

किरकोळ बाजारात लिंबांच्या एका गोणीचे भाव गेल्यावर्षीच्या तुलनेत तिपटीने वाढले आहेत. नगर जिल्ह्य़ातील राशिन परिसरात लिंबांची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. उन्हाळ्यात लिंबांना चांगली मागणी असते. त्यामुळे या भागातील लिंबू  उत्पादक  शेतक ऱ्यांनी लिंबाची तोड करून ती बाजारात विक्रीसाठी पाठविली. दुबार पिकासाठी पावसाळ्यात लिंबांच्या झाडांना पाणी मिळेल, या आशेने शेतक ऱ्यांनी तोड केली. मात्र, राशिन भागात पावसाने ओढ दिल्याने लिंबांची झाडे जळून गेली आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लिंबांची आवक कमी होत चालली आहे, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील लिंबांचे व्यापारी रोहन जाधव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

जाधव म्हणाले, नगर जिल्ह्य़ातील कर्जत तालुक्यातील राशिन परिसर, सोलापूर जिल्ह्य़ातील बार्शी भागात लिंबांचे उत्पादन घेतले जाते. पुणे जिल्ह्य़ातील लोणी काळभोर भागात तुरळक प्रमाणात लिंबांची लागवड केली जाते.

दिवाळीपर्यंत कांद्याचे भाव चढेच?

नवी मुंबई: पावसामुळे कांदा शेतातच भिजल्याने गेले काही दिवस खराब माल बाजारात येत आहे. आवक कमी होत असल्याने त्याचा दरावरही परिणाम होत आहे. घाऊक बाजारात कांदा २५ ते ३० रुपये प्रतिकिलो तर किरकोळ बाजारात दर ४० रुपयांपर्यंत गेला आहे.  गणेशोत्सवापूर्वी घाऊक बाजारात २२ ते २५ रुपये व किरकोळीत ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोचे दर होते. मात्र यात दहा रुपयांची वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. एपीएमसी बाजारात अतिवृष्टीच्या कलावधीत कांद्यावर काही परिणाम दिसला नाही. मात्र त्यांनतर भिजलेला कांदा आवक सुरू झाली आहे. तसेच आवकही कमी होत आहे. बाजारात १५० ते २०० गाडय़ांऐवजी  १०० ते १०७ गाडय़ाच माल येत आहे. दिवाळीनंतर बाजारात नवीन कांदा येतो. त्यामुळे दिवाळीपर्यंत तरी कांदा ग्राहकांना रडवणार असल्याचे दिसते.

गोणी हजार रुपयांना

लिंबांना हॉटेल व्यावसायिक तसेच लोणचे उत्पादकांकडून मोठी मागणी असते. गेल्यावर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात लिंबाच्या एका गोणीचा भाव १०० ते २०० रुपये असा होता. यंदा लिंबांच्या गोणीचा भाव ७०० ते १००० हजार रुपये असा आहे. लिंबांना उच्चांकी भाव मिळाला आहे. एका गोणीत आकारमान तसेच प्रतवारीनुसार ४०० ते ५५० लिंबे बसतात. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात मार्केटयार्डातील घाऊक बाजारात दररोज ३ ते ४ हजार गोणी लिंबांची आवक होत होती. सध्या रोज दीड हजार गोणींची आवक होत आहे, असे लिंबांचे व्यापारी रोहन जाधव यांनी सांगितले.

लिंबांचे दर

* लिंबांचा एका गोणीचा भाव प्रतवारीनुसार (४०० ते ५५० लिंबे) भाव- ७०० ते १००० रुपये

* किरकोळ बाजारात एका लिंबाचा दर- ४ ते ५ रुपये