News Flash

पुण्यात दोघांचे भांडण सोडवण्यास गेलेल्या तिसऱ्याचा मृत्यू

या घटनेत तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे

सागर चवगुले

पुण्यातील हडपसरजवळील डवरीनगर येथे दोन तरुणांच्या भांडणात तिसऱ्याच्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सागर चवगुले (वय २३) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून, या घटनेत तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डवरीनगरमध्ये कुत्रा अंगावर आल्याच्या रागातून नीलेश शिंदे आणि गणेश वाभळे या दोन तरुणांमध्ये सुरुवातीला किरकोळ वादावादी झाली. पुढे या वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले. ही हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या सागर चवगुले यालाच मारहाण करण्यात आल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या हाणामारीत सनी मारुती चवगुले याच्यासह अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, अन्य आरोपींचा शोध घेण्यात येतो आहे. हडपसर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 11:53 am

Web Title: one person dead in fight at pune
Next Stories
1 पुण्यात छोटा राजन टोळीच्या गुंडाला अटक
2 ‘माळढोक’मधील काळविटांची स्वतंत्र गणना!
3 ‘डीवाय’च्या छापासत्रांमागे लाखोंच्या पदव्यांची बोली?
Just Now!
X