News Flash

धक्कादायक : पुण्यात आईच्या कुशीतून एका वर्षाच्या बाळाचे अपहरण

बाळाच्या शोधासाठी पोलिसांनी नेमली तपास पथकं

प्रतीकात्मक छायाचित्र

पुण्यातील हडपसर भागात मागील आठवड्यात चार महिन्याच बाळ चोरून नेल्याची घटना घडली होती. मात्र त्या बाळाला काही तासात सुखरूप पोलिसांनी बाळाच्या आईच्या स्वाधीन केले.  या घटनेला काही दिवस होत नाहीत तोच अशीच एक घटना पुन्हा घडली आहे. हडपसर पुलाखाली आईच्या कुशीत एक वर्षाचे बाळ झोपले होते. तेवढ्यात दोन महिलांनी त्या बाळाचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

कार्तिक निलेश काळे वय एक वर्ष असे चोरून नेलेल्या बाळाचे नाव आहे. या प्रकरणी बाळाची आई शर्मिला निलेश काळे यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील उड्डाणपुलाखाली असलेल्या बीआरटी मार्गाच्या मोकळ्या जागेमध्ये मागील काही दिवसापासून शर्मिला आणि एक वर्षाचा कार्तिक नातेवाईकांसोबत राहत होता. पण आज सकाळच्या सुमारास शर्मिला यांना एक वर्षाचा कार्तिक आजूबाजूला कुठेच दिसत नाही. हे लक्षात येताच, त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र काही केल्या शोध लागला नाही.

त्यानंतर त्यांनी बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली असून त्यानुसार त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता. दोन महिला एका बाळाला सोलापूर रोडच्या दिशेने घेऊन जात असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून बाळाचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आल्याचे हडपसर पोलिसाकडून सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 10:04 pm

Web Title: one year old boy abducted from hadapsar pune scj 81 svk 88
Next Stories
1 पुण्यात २४ तासात आढळले २०६ नवे करोना रुग्ण तर पिंपरीत १६६ नवे रुग्ण
2 “त्या’ घटनेनंतर आता राज्यपालदेखील पहाटे…”- जयंत पाटील
3 “मेधा कुलकर्णींना विचारा चंद्रकांत पाटलांनी पुण्यात येऊन काय प्रश्न निर्माण केले?”
Just Now!
X