पुणे : करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने स्तर तीनचे निर्बंध लागू के ले आहेत. या काळातही आधार नोंदणी व दुरुस्तीची कामे करण्यास नागरिकांना मुभा आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युनिक आयडेंटिफिके शन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया – यूआयडीएआय) पूर्व नियोजित वेळ आरक्षित करून आधार नोंदणी व दुरुस्तीची कामे करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असली, तरी ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर असल्याने राज्यात के वळ मुंबई आणि नागपूरपुरतीच ती मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे हे दोन जिल्हे वगळता उर्वरित राज्यातील नागरिकांना प्रत्यक्ष आधार केंद्रांवर जाऊनच आधारची कामे करावी लागत आहेत.