News Flash

ऑनलाइन फसवणुकीचे सत्र कायम

वानवडी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन पद्धतीने दीड लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

चोरटय़ांच्या आमिषांना सामान्य बळी

शहरात ऑनलाइन फसवणुकीचे सत्र कायम असून चोरटय़ांनी दाखविलेल्या आमिषांना सामान्य बळी पडत आहेत. अशाप्रकारच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरटय़ांनी चार लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.

संकेतस्थळावर स्वस्तात दुचाकी विक्रीच्या आमिषाने फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अशा प्रकारची आठवडभरात दोन घटना घडल्या. औंध भागातील एका युवकाकडे लष्करात जवान असल्याची बतावणी करणाऱ्या चोरटय़ाने स्वस्तात दुचाकी विक्रीचे आमिष दाखविले. त्यानंतर चोरटय़ाने युवकाला पेटीएम खात्यात ८५ हजार ५०० रुपये जमा करण्यास सांगितले. युवकाने पैसे जमा केल्यानंतर चोरटय़ाने मोबाइल क्रमांक बंद केला. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर युवकाने नुकतीच चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या निरीक्षक  वैशाली गलांडे तपास करत आहेत.

वानवडी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन पद्धतीने दीड लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. अज्ञाताने ज्येष्ठ नागरिकाला काही दिवसांपूर्वी मेल पाठविला होता. ज्येष्ठ नागरिकाला आमिष दाखवून चोरटय़ाने त्यांना एका बँक खात्यात दीड लाख रुपये जमा करण्यास सांगितले. ते पैसे भरल्यानंतर चोरटय़ाशी संपर्क होऊ शकला नाही.

कोरेगाव पार्क भागातील बोट क्लब परिसरातील रहिवाशाची फसवणूक करण्यात आली. त्यांना बक्षीसाचे आमिष दाखविण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी अज्ञाताने त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला.

एका कंपनीकडून जाहीर झालेल्या योजनेत तुम्ही भाग्यवान विजेते ठरला आहात. तुम्हाला बक्षीस

म्हणून मोटार देण्यात येणार असल्याची बतावणी चोरटय़ाने केली होती. चोरटय़ांनी तक्रारादाराला एक बँक खात्यात ७९ हजार २५० रुपये जमा करण्यास

सांगितले. पैसे जमा झाल्यानंतर चोरटय़ाने मोबाइल क्रमांक बंद केला. पोलीस निरीक्षक  गणेश माने तपास करत आहेत.

भेटवस्तूच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र

परदेशात उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी तसेच विवाहाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भारती विद्यापीठ परिसरातील एका महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिला २८ हजार ५०० रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 5:14 am

Web Title: online fraud akp 94
Next Stories
1 गुन्हे वृत्त ; परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलेला गंडा
2 रेल्वे गाडीवर दरोडय़ाचा प्रयत्न; चोरटय़ांची टोळी जेरबंद
3 बनावट सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्याच्या गोदामावर छापा
Just Now!
X