18 October 2019

News Flash

यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चाचणी मालिका

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) पूर्वपरीक्षेसाठी चाचणी परीक्षेची ऑनलाईन मालिका सुरू करण्यात येणार असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सिओईपी) विद्यार्थ्यांनी या टेस्टची निर्मिती केली आहे.

| April 19, 2013 02:15 am

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) पूर्वपरीक्षेसाठी चाचणी परीक्षेची ऑनलाईन मालिका सुरू करण्यात येणार असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सिओईपी) विद्यार्थ्यांनी या टेस्टची निर्मिती केली आहे.   www.testmetrics.in या संकेतस्थळावर ही सिरीज उपलब्ध असणार आहे.
यूपीएससीची पूर्वपरीक्षा २६ मे रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना साहाय्य व्हावे यासाठी त्यांच्यासाठी मोफत ऑनलाईन चाचणी परीक्षेचा पर्याय आता उपलब्ध झाला आहे. सिओईपीचे विद्यार्थी प्रदीप चौधरी, गौरव बलदोटा, मयूर महाजन आणि एसएनजीबी सिओईच्या देवेन संचेती यांनी या चाचणी मालिकेची निर्मिती केली आहे. तीन चाचणी परीक्षांची ही मालिका असून या मालिकेतील २० ते २१ तारखेला या मालिकेतील पहिली चाचणी होणार आहे. ही चाचणी मालिका नव्या परीक्षा पद्धतीनुसार असणार आहे. त्याचबरोबर सर्व प्रश्नांची संपूर्ण उत्तरे, स्पष्टीकरण आणि विद्यार्थ्यांच्या गुणांची आलेखाच्या स्वरूपात मांडणीही देण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही चाचणी मालिका सुरू करण्यात आल्याचे या संकेतस्थळाच्या निर्मात्यांनी सांगितले.
या संकेतस्थळावरील चाचणी मालिकेमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या तीन उमेदवारांना अनुक्रमे दहा हजार, पाच हजार आणि तीन हजार रूपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. या संकेतस्थळाच्या माध्यमातून लवकरच देशपातळीवरील चाचणी मालिका सुरू करण्यात येणार आहे.

First Published on April 19, 2013 2:15 am

Web Title: online test series for upsc students
टॅग Upsc