News Flash

हिंजवडीत हाय अॅलर्टची केवळ अफवा; पोलिसांचे स्पष्टीकरण

हिंजवडीतील आयटी हबला हाय अलर्ट जारी करण्यात आल्याची चर्चा दिवसभर शहरात होती. यामुळे येथे काम करणारे अनेक संगणक अभियंते काळजीत होते.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याजवळच्या हिंजवडी येथील आययटी हबला कोणताही हाय अॅलर्ट देण्यात आलेला नाही, ही केवळ अफवा असल्याचे हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना स्पष्ट केले. हाय अलर्ट विषयी कुठल्याही प्रकारचा आदेश आम्हाला आलेला नाही. अॅलर्ट जारी केल्यानंतर केंद्र सरकारकडून आधी स्थानिक पोलिसांना माहिती दिली जाते असे त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरातील हिंजवडी आयटी हबला हाय अलर्ट जारी केल्याची चर्चा शहरात सुरू होती. याबाबत हिंजवडी पोलिसांकडे विचारणा केली असता आमच्याकडेच अशा प्रकराची कुठलीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ‘इन्फोसिस’ या नामांकित कंपनीला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ) सुरक्षा असून त्यांच्याकडेदेखील हाय अलर्ट विषयी काहीही माहिती आली नसल्याचे सूत्रांकडून कळते. त्यामुळे ही केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी येथील आयटी हबला हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असल्याची चर्चा दिवसभर शहरात होती. यामुळे नागरिक आणि येथे कामानिमित्त जाणाऱ्या संगणक अभियंत्यांना अनेक प्रश्न पडले होते. मात्र, आता पोलिसांनीच ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केल्याने त्यांनी निश्वास सोडला आहे.

हिंजवडीतील आयटी हबमध्ये अनेक परदेशी कंपन्या आहेत. त्यामुळे तेथील काही कंपन्यांना सीआयएसएफची कडक सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे हिंजवडीतील एका नामांकित कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी मेलद्वारे दिल्याची अफवा पसरली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 6:33 pm

Web Title: only rumors of high alert in hinjewadi on the backdrop of the pulwama attack says police explanation
Next Stories
1 संधी दिल्यास मावळमधून लढण्यास तयार : पार्थ पवार
2 पुणे: विमानात स्वयंप्रेरणेने उभे राहून प्रवाशांनी CRPF च्या शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली
3 काश्मीर प्रश्नी पंतप्रधान मोदींनी अटलजींची नीती अवलंबावी; काश्मिरी विद्यार्थ्यांची भावना
Just Now!
X