News Flash

‘कार्बन न्यूट्रल इको हाऊस’चे वळवण उद्यानामध्ये उद्घाटन

टाटा पॉवरने लोणावळा येथील वळवण उद्यानामध्ये देशातील पहिला कार्बन न्यूट्रल सेल्फ पॉवर्ड इको हाऊस हा प्रकल्प कार्यान्वित केला आहे.

| July 24, 2013 02:42 am

टाटा पॉवरने लोणावळा येथील वळवण उद्यानामध्ये देशातील पहिला कार्बन न्यूट्रल सेल्फ पॉवर्ड इको हाऊस हा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. पर्यावरणाला अनुकूल पद्धतीचा विकास आणि संवर्धन करण्याची वचनबद्धता हे वैशिष्टय़ असलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन टाटा पॉवरच्या ऑपरेशन विभागाचे प्रमुख अशोक सेठी यांच्या हस्ते झाले.
कार्यकारी संचालक एस. पद्मनाभन म्हणाले, ग्राहक, समाज आणि पर्यावरणाची काळजी घेणे म्हणजे शाश्वत विकास असे आम्ही मानतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा एकात्मिक वापर करून पर्यावरणावर कमीत कमी परिणाम होईल यासाठीच्या नावीन्यपूर्ण सुविधा कार्बन न्यूट्रल इको हटमध्ये तयार करण्यात आल्या आहेत. बांधकामासाठी सिमेंट आणि पाण्याचा कमीत कमी वापर, पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर, कमीत कमी दिवसांत बांधकाम, सौरऊर्जेवर चालणारी पीव्ही चॅनेल्स आणि पवनचक्कीमार्फत वीजपुरवठा करण्यात आला आहे. झाडांसाठी ठिबक सिंचन, शौचालयांमध्ये कमीत कमी पाण्याचा वापर, ऊर्जेविना चालणारा नैसर्गिक मातीचा रेफ्रिजरेटर, मेकॅनिकल स्विंग बेस्ड वॉशिंग मशिन, बिल्ट इन सोलर वॉटर हीटर आणि कुकर, अधिकाधिक सूर्यप्रकाश आणि खेळती हवा राहण्यासाठी खिडक्यांची योजना, पावसाच्या पाण्याचा उपयोग, घरगुती घनकचऱ्याचा पुनर्वापर ही या प्रकल्पाची वैशिष्टय़े आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2013 2:42 am

Web Title: opening of carbon neutral eco house in valvan garden
Next Stories
1 पिंपरी शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे यांचा राजीनामा
2 गुन्ह्य़ातून वगळण्याचा ‘कारा’ संस्थेच्या माजी संचालकाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
3 साक्ष देण्यास गैरहजर राहणाऱ्या पोलीस निरीक्षकाविरुद्ध वॉरन्ट
Just Now!
X