News Flash

कलेद्वारे अर्थ देणाराच खरा प्रतिभावंत – पं. हृदयनाथ मंगेशकर

गानवर्धन, पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र गुरुकुल आणि भीमसेन जोशी अध्यासनातर्फे आयोजित मुक्त संगीत चर्चासत्राचे उद्घाटन पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते झाले.

| July 26, 2014 03:14 am

संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या विराण्यांतून प्रत्येकाला वेगवेगळ्या अर्थाची प्रचिती येते. ज्ञानेश्वरांइतका प्रतिभावंत त्यांच्यानंतरच्या कालखंडात कोणी झालाच नाही. आपल्या कलेद्वारे प्रत्येकाला भावणारा अर्थ प्रतीत करू शकणाराच खरा प्रतिभावंत कलाकार असतो, अशी भावना ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
गानवर्धन, पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र गुरुकुल आणि भीमसेन जोशी अध्यासनातर्फे आयोजित मुक्त संगीत चर्चासत्राचे उद्घाटन पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते झाले. भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. सुहासिनी कोरटकर यांच्याशी ‘भाव भक्ती रस’ या विषयावर झालेल्या संवादातून पं. मंगेशकर यांनी निर्गुण भक्तीचे संगीताशी असलेले नाते उलगडले. ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग, ज्येष्ठ संगीत समीक्षक मा. कृ. पारधी, डॉ. शुभांगी बहुलीकर आणि संस्थेचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी या वेळी उपस्थित होते.
पं. मंगेशकर म्हणाले, अभंग, विराण्या आणि काव्याला स्वरबद्ध करताना संत ज्ञानेश्वर यांच्या वाङ्मयाचा अभ्यास झाला. गो. नी. दांडेकर, प्राचार्य राम शेवाळकर, शांता शेळके, शंकर वैद्य यांच्यासारख्या प्रतिभावंतांकडून या काव्याचा अर्थ जाणून घेतला.
कोणतीही कला मेहनतीशिवाय साध्य करता येत नाही. त्यामुळे काव्य स्वरबद्ध करताना त्यातील अर्थाच्या छटा रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठीचे प्रयत्न हा आवडीचा भाग झाला. मोठय़ा व्यक्तीकडून आपल्याला न समजणारे जाणून घेण्याची वृत्ती युवा पिढीमध्ये वाढली पाहिजे. गुरू हा देहातीत असतो. त्यामुळे संगीत साधना करताना कुठे अडलो तर पाठीशी असलेले गुरू मार्ग दाखवितात. त्यांच्याकडून प्रेरणा मिळते.
‘नित दिन बरसत नैन हमारे’, ‘अवचिता परिमळू’, ‘घर थकलेले सन्यासी’, ‘आम्ही ठाकर ठाकर’ यासारख्या रचना सादर करून पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यातील सौंदर्यस्थळे उलगडली. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 3:14 am

Web Title: opening of free music seminar by pandit rhudayanath mangeshkar
Next Stories
1 आयटी कंपनीकडून १०३ अभियंत्यांची चौऱ्याऐंशी लाख रुपयांची फसवणूक
2 पालिकेच्या दवाखान्यांमध्ये मोफत औषधे मिळणार
3 महापालिकेची मैदाने खेळाडूंना सवलतीत द्या
Just Now!
X