28 January 2020

News Flash

कुटुंबातील सदस्यांची नावे एकाच मतदान केंद्रावर घेण्याची संधी

वोटर हेल्पलाइन अ‍ॅप मोबाइलमधील प्लेस्टोअरमध्ये उपलब्ध आहे.

मतदार यादी पुनर्परीक्षण कार्यक्रम सुरू

पुणे : छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्परीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत येत्या १३ फेब्रुवारीपर्यंत मतदार पडताळणी कार्यक्रम (इलेक्टोरल व्हेरिफिकेशन प्रोग्राम – इव्हीपी ) राबवण्यात येणार आहे. या कालावधीत मतदारांना वोटर हेल्पलाइन या मोबाइल अ‍ॅप आणि www.nvsp.in  या ऑनलाइन प्रणालीद्वारे विविध गोष्टींचा लाभ घेता येईल.

वोटर हेल्पलाइन अ‍ॅप मोबाइलमधील प्लेस्टोअरमध्ये उपलब्ध आहे. अ‍ॅपमध्ये ई-पिक क्रमांक किंवा मतदारांच्या नावाने मतदार यादीतील नाव शोधल्यानंतर स्वत:च्या तपशिलाची पडताळणी करून योग्य माहिती असल्यास व्हेरिफाय करावे. जर मतदारांना स्वत:च्या तपशिलात दुरुस्ती करायची असेल तर तसा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

एनव्हीएसपी संकेतस्थळावर स्वत:च्या मोबाइल क्रमांकाद्वारे किंवा ई-मेल आयडीद्वारे नोंदणी करावी लागेल. यासाठी मतदाराला त्याचा दहा अंकी ई-पिन क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे. हा क्रमांक टाकल्यानंतर मतदारांना मतदार यादीत असलेल्या स्वत:च्या तपशिलाची पडताळणी करता येईल.

सर्व माहिती बरोबर असल्यास ‘व्हेरिफाय’ या बटणावर क्लिक केल्यास पडताळणी पूर्ण होणार आहे. मतदार यादीतील तपशिलात काही विसंगती किंवा दुरुस्ती असल्यास दुरुस्ती तपशील जोडून दुरुस्ती करता येणार आहे. या दोन्ही प्रणालींचा वापर करून मतदारांना कुटुंबातील सदस्यांची नावे एकाच यादी भागात आणि एकाच ठिकाणी ठेवण्याबाबत (फॅमिली टॅगिंग रिक्वेस्ट) विनंती करता येईल. मतदारांना मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या सोयींबाबतही अभिप्राय नोंदवता येणार आहे. तसेच कुटुंबातील भावी मतदारांची माहितीही देता येणार असून अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवकांची मतदार नोंदणी करता येणार आहे.

स्वयंस्फूर्तीने येण्याचे आवाहन

या कार्यक्रमांतर्गत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन योग्य ओळखपत्र आणि कागदपत्रांच्या पुराव्याची प्रत सादर करून मतदार तपशील प्रमाणीकरण करण्यासाठी पुढे यावे. मतदार संघाकडून मतदार पडताळणीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) गृहभेटी देऊन मतदार यादीचे पुनर्परीक्षण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत दुबार नाव असल्यास, स्थलांतर झाले असल्यास किंवा कुटुंबातील व्यक्ती मयत झाली असल्यास नाव वगळण्यासाठी अर्ज क्र. सात भरून देता येणार आहे, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी दिली.

First Published on January 15, 2020 4:10 am

Web Title: opportunity to get family members name at one polling station zws 70
Next Stories
1 थंडीमुळे निरोगी व्यक्तींमध्ये दम्याची लक्षणे
2 पुण्यात सोमवारी ‘लोकसत्ता साखर परिषद’
3 मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वेळापत्रकावर परिणाम
Just Now!
X