01 March 2021

News Flash

दिमाखदार ‘मारवाडी घोडे’ पाहण्याची संधी

येत्या शनिवारी आणि रविवारी सकाळी पुणे रेस कोर्सवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

२, ३ मार्चला रेस कोर्स मैदानावर ‘हॉर्स शो’

पुणे : आबालवृद्ध प्राणिप्रेमींना नेहमी भूरळ घालणारा दिमाखदार प्राणी म्हणजे घोडा. लढाऊ, चिवट आणि देखणा घोडा अशी ओळख असलेल्या मारवाडी प्रजातीच्या घोडय़ांचा रूबाब पाहण्याची संधी पुणेकरांना शनिवार आणि रविवारी (२, ३ मार्च) होणाऱ्या ‘वेंकीज मारवाडी हॉर्स शो’मध्ये मिळणार आहे.

‘इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशन’चे अध्यक्ष अजय नेन्सी आणि उपाध्यक्ष केशव जोशी यांनी याबाबत माहिती दिली. ‘इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशन’तर्फे रेस कोर्स मैदानावर ‘वेंकीज मारवाडी हॉर्स शो’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेसहा या कालावधीत अश्वप्रेमींसाठी हा कार्यक्रम विनामूल्य खुला आहे.

येत्या शनिवारी आणि रविवारी सकाळी पुणे रेस कोर्सवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. घोडय़ांच्या वयोगटानुसार सहा विभागांमध्ये उत्कृष्ट घोडय़ांची स्पर्धा घेण्यात येणार आहे. देशभरातील अश्वप्रेमी आणि अश्वपालक या कार्यक्रमासाठी आवर्जून हजेरी लावणार आहेत. शनिवारी सकाळी सकाळी दहा ते साडेअकरा या वेळात मारवाडी घोडय़ांची स्पर्धा होणार आहे, तर रविवारी साडेदहा वाजता या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धा यंदाच्या हॉर्स शोचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.

अजय नॅन्सी म्हणाले, ब्रिटिश काळात त्यांच्याकडील घोडय़ांच्या प्रजाती भारतात आल्या आणि भारतीय अश्वांपैकी सर्वात लढाऊ  आणि दिमाखदार मारवाडी अश्वांची प्रजाती मागे पडली. मात्र आता अनेक अश्वप्रेमी मारवाडी प्रजातीच्या घोडय़ांचे जतन आणि पालनपोषण करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. सध्या मारवाडी घोडय़ांची परदेशात विक्री करण्यावर बंदी आहे मात्र देशभर ठिकठिकाणी होणाऱ्या अश्वांच्या जत्रांमध्ये मारवाडी घोडे मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळतात. रेस कोर्स मैदानावर होणारा ‘वेंकीज मारवाडी हॉर्स शो’ हे मारवाडी घोडय़ांच्या प्रदर्शनातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. लहान मुले आणि प्राणिप्रेमींसाठी या प्रदर्शनाला भेट देणे हा संस्मरणीय अनुभव ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 4:04 am

Web Title: opportunity to see the marwari horses at race course
Next Stories
1 पिंपरीत बीआरटी मार्ग ‘सर्वांसाठी’
2 नाटक बिटक : ‘फिजिकल थिएटर’च्या अर्थपूर्ण नाटय़कृती
3 तीन वर्षीय बालकाच्या अपहरण प्रकरणाचा उलगडा; महिलेसह दोघे अटकेत
Just Now!
X