‘टाटा मेमोरिअल सेंटर’चे विश्लेषण  

पुणे : मुख कर्क रोगाच्या जगातील एकूण रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण भारतात आढळत असून उपचारांवर खर्च होणारा पैसाही प्रचंड आहे. केवळ २०२० मध्ये देशात तोंडाच्या कर्क रोगावरील उपचारांसाठी २,३८६ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, तर पुढील दहा वर्षांमध्ये देशावर २३,७२४ कोटी रुपयांचा उपचारभार पडू शकतो.

मुख कर्करोगावरील उपचार खर्चभाराचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘टाटा मेमोरिअल सेंटर’ने त्याचे विश्लेषण केले आहे. जागतिक स्तरावर निम्न आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये ७० टक्के  मृत्यू कर्क रोगामुळे होतात. मुख कर्क रोग या के वळ एकाच प्रकारच्या कर्क रोगाचे २०२० मध्ये जागतिक स्तरावरील एक तृतीयांश रुग्ण भारतात होते. हा कर्क रोग सर्वाधिक प्रमाणात पुरुषांना होतो. त्यावर उपचार घेणारे बहुतांश रुग्ण बेरोजगार असतात. मित्र किं वा कु टुंबीयांवर त्यांचे आर्थिक ओझे होते. आरोग्य विमा किं वा शासकीय योजनांमध्ये उपचारांसाठी आवश्यक असलेली रक्कम पुरवली जात नाही, त्यामुळे उपचारांचा खर्च वाढतो आणि रुग्ण तसेच त्यांचे कु टुंबीय कर्जबाजारी होतात.

दोन दशकांत ६८ टक्के रुग्णवाढ

टाटा मेमोरिअल सेंटरचे संचालक डॉ. राजन बडवे म्हणाले, की ‘ग्लोबोकॉन’च्या आकडेवारीनुसार गेल्या दोन दशकांमध्ये रुग्णांचे प्रमाण ६८ टक्के  वाढले आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आजार आणि उपचारांबाबत साक्षरता नसल्याने १० टक्के  रुग्ण आजार गंभीर अवस्थेत पोहोचल्यानंतर उपचारासाठी येतात. त्यांच्यावर उपचार करणे कठीण असते.

टाटा मेमोरिअल सेंटरचे संशोधक आणि या अभ्यासाचे प्रमुख डॉ. अर्जुन सिंह म्हणाले, की कर्क रोग बळावल्यावर उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या युनिटची किं मत ही प्राथमिक टप्प्यात वापरल्या जाणाऱ्या युनिटच्या तुलनेत तब्बल ४२ टक्के  अधिक आहे. उपचारांवरील खर्चापैकी ९८ टक्के  खर्च वैद्यकीय उपकरणांचा आहे. बळावलेल्या कर्क रोगावर शस्त्रक्रिया करताना प्राथमिक टप्प्याच्या तुलनेत दीड टक्के  खर्च वाढतो. के मो किं वा किरणोत्सर्ग (रेडिएशन) उपचारांमुळे सरासरी कि मतीत ४५ टक्के  वाढ झाली आहे. भारतात ६० ते ८० टक्के  रुग्ण कर्क रोग बळावल्यानंतर कर्क रोग तज्ज्ञाकडे येतात.

महागाई वाढणार नाही, असे गृहीत धरल्यास पुढील दहा वर्षांमध्ये तोंडाच्या कर्क रोगामुळे भारतावर २३,७२४ कोटी रुपयांचा भार पडणार आहे. तोंडाच्या कर्क रोगाचे उशिरा होणारे निदान २० टक्के  रुग्णांमध्ये योग्य वेळी झाले तर दरवर्षी २५० कोटी रुपयांची बचत शक्य असल्याचे डॉ. सिंह यांनी सांगितले.

उपचाराचे अर्थकारण

’१० टक्के  रुग्ण आजार गंभीर अवस्थेत पोहोचल्यानंतर उपचारासाठी येतात.

’येत्या दहा वर्षांत मुख कर्क रोगाच्या उपचारांचा देशावर २३,७२४ कोटींचा भार.

’योग्य वेळी रोगनिदान झाले तर दरवर्षी २५० कोटी रुपयांची बचत.

’उपचार खर्चापैकी ९८ टक्के  खर्च वैद्यकीय उपकरणांसाठी.