06 March 2021

News Flash

पी. साईनाथ यांना टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर

‘केसरी’चे विश्वस्त- संपादक आणि टिमविचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली.

केसरी-मराठा ट्रस्ट आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ‘द हिंदूू’च्या ग्रामीण व्यवस्था विभागाचे माजी संपादक पी. साईनाथ यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘केसरी’चे विश्वस्त- संपादक आणि टिमविचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली.

‘केसरी’च्या च्या १३६ व्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी (४ जानेवारी) केसरीवाडा प्रांगणात सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पी. साईनाथ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या पत्रकाराला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्काराने गौरविले जाते. या पुरस्काराचे यंदा नववे वर्ष आहे. या कार्यक्रमात अनाथ िहदू महिलाश्रम, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था आणि वसंत व्याख्यानमाला या संस्थांना जयंतराव टिळक स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

देशातील ग्रामीण वास्तव आणि शेतकरी आत्महत्येचा प्रश्न यावर सातत्याने लेखन करणाऱ्या साईनाथ यांना विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कारांबरोबरच रामनाथ गोयंका पुरस्कार, प्रेम भाटिया स्मृती पुरस्कार, ग्रामीण पत्रकारितेबद्दल ‘द स्टेटमन’ पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. युरोपियन संघाचा पुरस्कार पटकाविणारे ते पहिले भारतीय पत्रकार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2017 4:52 am

Web Title: p sainath get lokmanya tilak journalism award
Next Stories
1 नववर्षांच्या पहिल्याच दिवशी द्रुतगतीवर वाहनांच्या रांगा
2 पिंपरीत १७८ तळीरामांवर कारवाई
3 जखमी प्रवाशाला मदत न करता पीएमपीचालक पसार
Just Now!
X