News Flash

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सिंधुताई सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

...अन् मी अनाथांची माय झाले म्हणत सांगितला अंगावर काटा आणणारा प्रवास

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यात महाराष्ट्राला एक पद्मभूषण आणि पाच पद्मश्री पुरस्कार मिळणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना समाजकार्यात भरीव कामगिरी केल्याबद्दल मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी ‘लोकसत्ता.कॉम’शी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. रेल्वेत भीक मागणारी बाई ते अनाथांची माय हा अंगावर काटा आणणारा प्रवास त्यांनी त्यांच्याच शब्दात उलगडला आणि पुरस्कार लोकांना अर्पण केला.

मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा; सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्री जाहीर

“माझा खरा परिचय रेल्वेत भीक मागणारी बाई आणि रात्री भीक मागणाऱ्यांना जेऊ घालणारी अशी माझी एक ओळख होती. मी गाणं म्हटले की मला खायला मिळायचं. रात्रीची मला खूप भीती वाटायची. त्यामुळे जेऊन झाल्यावर सर्व भिकारी झोपून जायचे. त्यामुळे मी स्मशानात जायचे. कारण मला एक माहिती होते की भूताच्या भीतीने स्मशानात कोणी येत नाही आणि त्यामुळे स्मशानात अंधार, ओरडणारे पक्षी, गाडलेलं प्रेत आणि जळणार्‍या प्रेतावर भाकरी भाजणारी अशी मी होते. आता त्या कल्पनेने अंगावर काटा येतो. तेव्हा मी जगले तेव्हा समजलं की अनुभव हाच जगण्याची खात्री होती. ही वेळ इतर कोणत्याही बाईवर येऊ नये एवढंच वाटते हा मी निर्धार केला आणि शपथ घेतली आणि अनाथांची माय झाले”, असा अंगावर काटा आणणारा प्रवास त्यांनी उलगडून सांगितला.

सिंधूताई सपकाळ

“अनाथ मुले, महिलांचे अनेक प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न केला. हे सारे लोक मग माझ्यासोबत राहू लागले. त्यांना पुढे घेऊन जाण्याचं काम, आजपर्यंत मी केलं आहे. आजवरच्या प्रवासात समाजातील सर्वांनी सढळ हाताने मदत केली. त्या सर्वांना मी हा पुरस्कार अर्पण करते. कधी कल्पनादेखील केली नव्हती की पद्मश्रीसारखा पुरस्कार मला मिळेल. हे कसं शक्य झालं हे मला माहिती नाही. कारण मी चौथी पास बाई. त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी एक धक्काच आहे”, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 11:19 pm

Web Title: padmashree award winner sindhutai sapkal first reaction shares thrilling experiences of life svk 88 vjb 91
Next Stories
1 Video: ‘आयर्नमॅन’ पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना अश्रू अनावर होतात तेव्हा…
2 “…वाजवा किती वाजवायचं ते,” अजित पवारांचा विरोधकांना टोला
3 “ठाकरे सरकार पडलं नाही तरी…,” गिरीश बापट यांचं मोठं विधान
Just Now!
X