पिंपरी-चिंचवड नजीकच्या पुनावळे येथे इमारतीचे रंगकाम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. राधेशाम रामबच्चन वर्मा (वय ३३) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश वर्मा यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. ठेकेदाराने कामगारांना सुरक्षा साधने पुरवली नाहीत. याप्रकरणी ठेकेदार तुषार पाटील, विजय बालवाडकर यांच्याविरुद्ध कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल निष्काळजीपणा दाखविल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.