News Flash

पांजरपोळ संस्थेकडून महापालिके ला ४३ लाखांची मदत

वैद्यकीय उपकरणे खरेदीचे उद्दिष्ट

(संग्रहित छायाचित्र)

वैद्यकीय उपकरणे खरेदीचे उद्दिष्ट

पुणे : महापालिके ला वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी पुणे पांजरपोळ ट्रस्टच्या वतीने २१ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. या रकमेचा धनादेश पांजरपोळ ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांकडे दिला. याशिवाय डॉ. नायडू सांसर्गिक रोग रुग्णालयाला अकरा लाख आणि ससून रुग्णालयाला अकरा लाख रुपये अशी एकूण ४३ लाख रुपयांची मदत पांजरपोळ ट्रस्टकडून करण्यात आली आहे.

करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मदतीचे आवाहन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी के ले होते. त्यानुसार वैयक्तिक स्तराबरोबरच समूह, संस्था, बँका, कं पन्यांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्याअंतर्गत पांजरपोळ ट्रस्टकडून तब्बल २१ लाख रुपयांची मदत महापालिके ला करण्यात आली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त शेखर गायकवाड, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेता धीरज घाटे, पांजरपोळ ट्रस्टचे संचालक श्रीधर पित्ती, व्यवस्थापकीय विश्वस्त ओमप्रकाश रांका, वस्तुपाल रांका, सुहास बोरा, राजेश सांकला, भवरलालजी जैन, सुभाष राणावत या वेळी उपस्थित होते.

महापालिका रुग्णालयात कोणत्या प्रकारची अद्ययावत साधनसामग्री आणि उपकरणे आवश्यक आहेत, याची यादी करण्यात आली आहे. त्यानुसार पांजरपोळ ट्रस्टकडून वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी हा निधी देण्यात आला आहे. डॉ. नायडू रुग्णालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयासाठीही प्रत्येकी अकरा-अकरा लाखांची आर्थिक मदत ट्रस्टकडून करण्यात आली आहे. भविष्यातही महापालिके ला आवश्यकता भासल्यास मदत के ली जाईल, असे ट्रस्टचे श्रीधर पित्ती आणि ओमप्रकाश रांका यांनी सांगितले. दरम्यान, दूध न देणाऱ्या आणि अनाथ गाईंचा सांभाळ करणे ज्यांना शक्य नाही, अशा सर्व गाई भोसरी येथील पांजरपोळ संस्थेत नोंदणीकृत केल्यास त्यांचा विनामूल्य सांभाळ के ला जाईल, असे त्यांनी सांगितले.

महापालिके ला ५३ लाखांचे अर्थसाहाय्य या मदतीशिवाय महापालिके ला ५३ लाख ५२ हजार ९६४  रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. महापालिके चे अधिकारी, कर्मचारी, सामान्य नागरिक, मंडळे, संस्था, संघटना, ट्रस्ट यांच्याकडून आर्थिक मदत, तर कं पन्यांनी त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाअंतर्गत महापालिके ला आवश्यक ती तातडीची वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 12:53 am

Web Title: panjarpol sanstha donate 43 lakh to pune municipal corporation zws 70
Next Stories
1 सर्दी, खोकला, ताप भरल्यास कोव्हिड काळजी केंद्रात उपचार घ्या
2 ऑनलाइन स्वयम् अभ्यासक्रमांची कक्षा रुंदावण्याचे नियोजन
3 Coronavirus : पुण्यात दिवसभरात सहा जणांचा मृत्यू
Just Now!
X