पार्थ अजित पवार हे कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे सध्या चर्चेत राहात आहेत.आकुर्डी येथील इस्कॉन मंदिराच्या श्री जगन्नाथ रथ यात्रेत सहभागी होत चक्क पार्थ पवार यांनी धार्मिक गीतावर ठेका धरल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हरे राम… हरे राम, हरे कृष्णा…कृष्णा या गीतावर त्यांनी नृत्य केलं.पार्थ यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टंटबाजी तर नाही ना अशी चर्चा सध्या पिंपरी-चिंचवड शहरात सुरू आहे.

पार्थ अजित पवार यांना मावळ लोकसभेची उमेदवारी मिळाल्यापासून कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे ते चर्चेत राहात आहेत.उमेदवारी मिळाल्यानंतर आजोबा शरद पवार यांच्या उपस्थित त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

मात्र,त्यांनी अडखळत केलेल्या भाषणामुळे चांगलेच चर्चेत राहिले,त्यांची विरोधकांनी खिल्ली ही उडवली. शनिवारी झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्याने ते पुन्हा सोशीयल मीडियावर चर्चिले जात आहेत अनेकांनी त्यांच्यावर टीका केल्याचं पाहायला मिळाल.शनिवारी आकुर्डी येथील इस्कॉन मंदिराच्या श्री जगन्नाथ रथ यात्रेत सहभागी होत त्यांना कार्यकर्त्यानी ठेका धरण्यास लावला हा व्हिडिओ अवघ्या ३४ सेकंदाचा असून मुक्त पणे नृत्य करताना पार्थ पवार हे दिसत आहेत.