योग्य कागदपत्रे नियमानुसार सादर केलीत तर पासपोर्ट मिळवण्यात कुठलीही अडचण येत नाही, असा निर्वाळा पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी वार्ताहरांना सांगितले. ते म्हणाले की, येत्या एप्रिल महिन्यात पुण्यात सामान्य लोकांसाठी पासपोर्ट मेळावा घेतला जाईल, त्यात लोकांना लवकर पासपोर्ट मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील.  कोल्हापूर, सांगली येथे ऑनलाईन सुविधा सुरू केली असून ती नगर व सोलापूरलाही सुरू केली जाईल, असे ते म्हणाले.
गोतसुर्वे यांनी सांगितले की, क्रमांक चारच्या कलमातील माहिती तुम्ही कशी भरता यावर बरेच काही अवलंबून असते, हा रकाना तुमच्या पत्त्याची माहिती विचारणारा आहे. त्यात चुकीची माहिती दिल्यास गोंधळ होतात. त्यामुळे पत्त्याची माहिती देताना आधारकार्ड, राष्ट्रीयीकृत, सहकारी व शेडयूल्ड बँकेच्या खात्याची झेरॉक्सप्रत चालू शकते; भले ते खाते उघडून दोन-तीन महिने झाले असतील तरी चालतात. जे विद्यार्थी म्हणून राहतात किंवा काही व्यक्ती भाडय़ाने राहतात त्यांनी भाडेकरार उपलब्ध करून दिल्यास तोही ग्राह्य़ धरला जातो. मतदान ओळखपत्र, वीज बिल, पोस्टपेड फोन बिल, पॅनकार्ड, मतदार कार्ड हे पत्त्यासाठी चालू शकतात.
 ते म्हणाले की, २६ जानेवारी १९८९ पूर्वी जन्मलेल्या व्यक्तींकडे जन्मदाखला नसेल तर ते शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देऊ शकतात व २६ जानेवारी १९८९ नंतर जन्मलेले लोक जन्मप्रमाणपत्र देऊ शकतात, तिथे मात्र तेच द्यावे लागते. लहान मुलांचा पासपोर्ट काढताना ते अल्पवयीन असतील तर पालकांनी परिशिष्ट ‘एच’ म्हणजे पालकांची पासपोर्ट काढण्याला हरकत नसल्याचा फॉर्म भरणे आवश्यक असते. मुलांच्या पत्त्यासाठी आधारकार्ड किंवा आईवडिलांचे नाव असलेला पत्त्याचा पुरावा चालतो.  विवाहित स्त्रियांचे पहिले नाव बदलले नसेल तर विवाहाचे प्रमाणपत्र चालते पण पत्नीचे पहिले नाव बदलले असेल तर फॉर्म ‘डी’ किंवा फॉर्म ‘इ’  हे नावातील बदलाचे फॉर्म भरून नोटराईज करून घ्यावे लागतात. दोन पेपरात नाव बदलाची जाहिरात दिलेली असावी लागते.
पासपोर्ट नव्याने काढत असाल तर ठीक आहे, पण जर तो पुन्हा काढत असाल तर मागच्या फाइलचा क्रमांक तुम्हाला माहिती असणे आवश्यक असते. जरी तुम्ही एखादेवळी पूर्वी अर्ज केला असेल व पासपोर्ट मिळाला नसेल तरीही त्या फाईलचा किंवा प्रकरणाचा क्रमांक तुम्ही देणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. तत्काळ पासपोर्टसाठी  परिशिष्ट ‘आय’ फॉर्म भरून तो नोटराईज करून घ्यावा म्हणजे ऐनवेळी कुणाची सही मिळत नसतानाही पासपोर्ट मिळू शकतो.
पासपोर्टचे प्रकार
राजनैतिक- राजनैतिक अधिकाऱ्यांसाठी (लालसर रंग)
अधिकृत- सरकारी अधिकाऱ्यांसाठी (पांढरा रंग)
सामान्य- सामान्य लोकांसाठी (नेव्ही ब्लू रंग)
पासपोर्ट दिल्याची संख्या
२०१३- १ लाख ८० हजार
२०१४ – २ लाख १० हजार ( पूर्वीच्या तुलनेत १६ टक्के वाढ)
मार्च २०१५ पर्यंत- ५३ हजार (पूर्वीची वर्षांची मर्यादा ५० ते ६० हजार)
पासपोर्ट आवश्यक असलेल्या परीक्षा- आयइएलटीएस, जीआरई (विद्यार्थ्यांसाठी)
तत्काळसाठी रोजच्या अ‍ॅपॉइंटमेट- १६० (पूर्वी ११०) ( दुपारी बारा वाजता इंटरनेटवर अ‍ॅपॉइंटमेंट सुरू)
पासपोर्ट नाकारले जाण्याचे प्रमाण –१० टक्के ( कागदपत्रातील त्रुटी हे कारण)
पासपोर्ट संकेतस्थळाचे नाव- www. passport.india.gov.in
पासपोर्टच्या किमती-  साधा १५०० रूपये, तत्काळ ३५०० रूपये, जंबो (६० पानी)- २००० रूपये (तत्काळ-४००० रूपये)
विशेष सूचना- अर्ज भरताना जास्त वेगवान इंटरनेट वापरा.
मोबाईल सेवा- केवळ तीस रूपये भरून तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमच्या अर्जाची स्थिती (कुठल्या टप्प्यावर आहे) समजून घेऊ शकता .

tax fraud case
१७५ कोटींचे कर फसणूक प्रकरण : विक्रीकर अधिकारी व १६ जणांवर गुन्हा दाखल, एसीबीची कारवाई
Buldhana, Minor Girl, sexually Tortured, Case Registered, female friend,
बुलढाणा : अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार; मैत्रिणीनेच दिला दगा….
dharavi redevelopment project pvt ltd marathi news, dharavi business owners marathi news
धारावी पुनर्विकासात व्यावसायिकांना आता जीएसटी सवलतीचे गाजर…पण पुनर्विकास कोठे होणार याबाबत मौन!
promote electric vehicles in India
भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन प्रस्ताव, कोणता ठरणार फायदेशीर?