पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण ९५ टक्के भरले असून, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने पवना धरण लवकरच भरेल असे सांगण्यात आले आहे. तसेच, १०० टक्के पवना धरण भरल्यास धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाचे प्रमाण पाहाता लवकरच धरण लवकरच भरले जाण्याची शक्यता आहे.  या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आली आहे. पवना धरण १००% भरल्यानंतर लगेचच धरणाच्या सांडव्यावरुन पाणी नदी पात्रात साेडले जाणार आहे. तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांनी सतर्क राहावे. नदी काठावरील सर्व साधनसामुग्री, वाहने, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावीत. जेणेकरून कुठल्याही प्रकारची हानी हाेणार नाही. अशी काळजी घेण्यात यावी व जलसंपदा विभागास सहकार्य करावे, अशी महत्वाची सूचना करण्यात आली आहे.

पाहा फोटो >> नजर हटणार नाही असे पवना धरण परिसराचे विलोभनीय सौंदर्य

पवना धरण परिसरात गेल्या २४ तासात ३६ मिलिमीटर पाऊस झाला असून आत्तापर्यंत १ हजार ४६१ पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने ३ हजार १५४ मिलिमीटर पावसाची नोंद आजतागायत झाली होती. दरम्यान, शुक्रवारपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून धरण ९५ टक्के भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच धरण १०० टक्के भरले जाणार आहे.