राजेश पाटील नवे पालिका आयुक्त

पिंपरी : जवळपास चार वर्षे पिंपरी महापालिकेच्या आयुक्तपदी राहिलेल्या श्रावण हर्डीकर यांची शुक्रवारी बदली झाली. नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क, पुणे या पदाची जबाबदारी हर्डीकरांवर सोपवण्यात आली. तर, पालिका आयुक्त म्हणून राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Thane Division, Devendra Fadnavis
ठाणे विभाग भाजपासाठी महत्त्वाचा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुचक विधान
kolhapur, crematorium
कोल्हापूरकरांचे असेही दातृत्व; स्मशानभुमी दानपेटीत २ लाखांवर देणगी जमा
satej patil , raju shetty
साखरपुडा – लग्नावरून सतेज पाटील – राजू शेट्टी यांच्यात जुंपली
Hasan Mushrif
आम्हालाही प्रत्युत्तर द्यावे लागेल – हसन मुश्रीफ यांचा कोल्हापुरातील ‘मविआ’ला इशारा

हर्डीकर यांच्याबरोबरच जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांची यशदाचे महासंचालक, तर एन. के . सुधांशु यांची जमाबंदी आयुक्त या पदावर आणि अपंग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची वर्धा जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

फेब्रुवारी २०१७ च्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने पिंपरी पालिका जिंकली, त्यानंतर, एप्रिल २०१७ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि नागपूरच्या आयुक्तपदावर असणाऱ्या हर्डीकर यांची पिंपरीत नियुक्ती झाली. शहराच्या राजकारणाचा एकूण रागरंग लक्षात आल्यानंतर हर्डीकरांनी लोकप्रतिनिधींशी संघर्ष टाळला. थोडय़ाच कालावधीत लोकप्रतिनिधी त्यांना डोईजड झाले. परिणामी, वारंवार संघर्ष होत राहिला. ‘भाजपधार्जिणे’ असा आरोप करत विरोधकांनी विशेषत: राष्ट्रवादीने त्यांच्यावर सातत्याने हल्ला केला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्यामुळे हर्डीकर राष्ट्रवादीला झुकते माप देऊ लागले. अलीकडे ‘पवार म्हणतील तसंच’ अशी भूमिका हर्डीकर घेत होते. त्यावरून भाजपचे नेते, आमदार, नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात उघड मोहीम सुरू केली.

त्यांची बदली होणार, अशी चर्चा वर्षभरापासून सुरू होती. त्यांना पदोन्नती मिळाल्यानंतर या चर्चेला बळ मिळाले. अखेर, शुक्रवारी त्यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब झाले. हर्डीकरांच्या कार्यपद्धतीवर विविध आक्षेप व्यक्त होत राहिले तरीही त्यांच्या काळात अनेक चांगली कामे व शहरहिताचेही निर्णय झाले. ठोस भूमिकेचा अभाव, धरसोडपणा आणि कायम वादात राहिल्याने त्यांची कामे झाकोळून गेली.

नवे आयुक्त खान्देशाचे

राजेश पाटील हे २००५ च्या तुकडीचे आय.ए.एस. अधिकारी आहेत. ओरिसा संवर्गातील पाटील यांची महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर प्रथमच नियुक्ती झाली आहे. ते मूळचे खान्देशातील रहिवासी आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. स्वतची ओळख निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा ठेवून त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. काम करून शिक्षण पूर्ण केले. स्पर्धा परीक्षा दिली, कठोर परिश्रम केले, त्यात त्यांना यश मिळाले.