X
निवडणूक निकाल २०१७

मिळकतकराचा १०० कोटींचा ऑनलाइन भरणा

सोपी व सुटसुटीत पद्धती वाटत असल्याने सहा महिन्यांत १०० कोटींचा ऑनलाइन भरणा जमा झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सहा महिन्यांत २५० कोटींची मिळकतकर वसुली

पिंपरी पालिकेने सहा महिन्यांत मिळकतकर वसुलीचा २५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून त्यामध्ये ऑनलाइन भरण्याद्वारे आलेली रक्कम सर्वाधिक आहेत. सोपी व सुटसुटीत पद्धती वाटत असल्याने सहा महिन्यांत १०० कोटींचा ऑनलाइन भरणा जमा झाला आहे.

महापालिकेने ऑनलाइन करभरणा सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर शहरवासीयांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला आहे. काही वर्षांतील आकडेवारी पाहता यातील वाढ दिसून येते. २००९-१० या वर्षांत २ कोटी ११ लाख रुपये भरणा ऑनलाइनद्वारे झाला, तेव्हा ३ हजार ८३५ नागरिकांनी एकूण मिळकतकर वसुलीच्या २.०६ टक्के रक्कम ऑनलाइन सुविधेद्वारे जमा केली होती. त्यानंतर, २०१०-११ या वर्षांत ७ कोटी २९ लाख रुपये (४.५६ टक्के), २०११-१२मध्ये १३ कोटी ६२ लाख रुपये (७.१६ टक्के), २०१२-१३ या वर्षांत २६ कोटी ९६ लाख रुपये (१०.४१ टक्के), २०१३-१४ या वर्षांत ४६ कोटी ९७ लाख रुपये (१५.२६ टक्के), २०१४-१५ या वर्षांत ६४ कोटी ६८ लाख रुपये (१६.४९ टक्के), २०१५-१६ या वर्षांत ८० कोटी ५५ लाख रुपये (१९.५५ टक्के) आणि २०१६-१७ या वर्षांत ८० कोटी ३६ लाख रुपये ऑनलाइन मिळकतकर भरणा झाला आहे. यंदाच्या वर्षांत पहिल्या सहा महिन्यांत १०० कोटींचा टप्पा गाठला आहे. ऑनलाइन भरणा करणाऱ्यांमध्ये आठ वर्षांत ४० पटीने वाढ झाली आहे. ऑनलाइन भरणा करणाऱ्या नागरिकांना सामान्यकरात दोन टक्के सवलत मिळत आहे.

पहिल्या सहा महिन्यांत  मिळकतकर वसुलीत रोख स्वरूपात ४९ कोटी २० लाख रुपये, धनादेशाद्वारे ८६ कोटी २२ लाख, डिमांड ड्राफ्ट सात कोटी ५२ लाख, ऑनलाइन १०० कोटी, समायोजित रक्कम ९ कोटी ८८ लाख रुपये आदी मिळून २५२ कोटी ५८ लाख रुपये जमा झाले आहेत.

दिलीप गावडे, सहआयुक्त

Outbrain