५२ लाखांच्या जादा खर्चास बिनबोभाट मंजुरी

पिंपरी : पवनाथडी जत्रेची उपयुक्तता काहीच नाही, दरवर्षी खर्च वाढतोच आहे, अशी कारणे देत पवनाथडी बंद करण्याची भाषा करणाऱ्या पिंपरी पालिकेतील सत्ताधारी नेत्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिळून पवनाथडीचा खर्च तब्बल एक कोटीच्या घरात नेऊन ठेवला आहे. याविषयी कोणतीही चर्चा न करता वाढीव ५२ लाख रुपयांसह ९७ लाखाच्या खर्चास स्थायी समितीने बिनबोभाट मंजुरी दिल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत.

bse listed companies marathi news
गुंतवणूकदार ४०० लाख कोटींचे धनी
ED action on assets worth 36 crores in Wadhwaan embezzlement case
मुंबई : वाधवान गैरव्यवहार प्रकरणात ३६ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!
92 crores recovered from the implementation of Mumbai Maharera orders
मुंबई महारेराच्या आदेशांच्या अंमलबजावणीतून ९२ कोटींची वसुली

शहरातील बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी हक्काची बाजारपेठ असावी, या हेतूने पुण्यातील ‘भीमथडी‘च्या धर्तीवर पिंपरीत २००७-८ पासून ‘पवनाथडी‘ जत्रेचे आयोजन करण्यात येऊ लागले. सुरुवातीला या उपक्रमाचे बरेच कौतुक झाले. त्यानंतर, यातील उणिवा आणि गैरप्रकार प्रकर्षांने दिसू लागले. पवनाथडीसाठी होणाऱ्या अवास्तव खर्चाचा मुद्दा आणि पवनाथडीचे स्थळ हा कायम टीकेचा विषय बनला होता.

पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर, भाजप नेत्यांनी पवनाथडीवर होणाऱ्या जादा खर्चाचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या १२ वर्षांत पवनाथडीची काहीच उपयुक्तता दिसून येत नसल्याचा युक्तिवाद करत खर्च कमी करा अथवा पवनाथडी बंद करा, अशी निर्वाणीची भाषा केली. प्रत्यक्षात, त्यानंतरही खर्च वाढतच गेला. चालू वर्षांत ४ ते ८ मार्च २०२० मध्ये झालेल्या पवनाथडीसाठी ४५ लाख खर्चाची तरतूद होती. प्रत्यक्षात ९७ लाख रुपये खर्च करण्यात आला. पवनाथडीत झालेल्या खर्चाची बिले वेळेत सादर झाली नाहीत. त्यामुळे बिलाची रक्कम २०२०-२१ या चालू वर्षांतील पवनाथडीच्या तरतुदीतून द्यावी लागणार आहे. ही रक्कम ५२ लाखांच्या घरात जाते.