News Flash

करोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिकांमधील दुवा व्हावं – उद्धव ठाकरे

पुण्यातील आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींना केले आवाहन

संग्रहित

करोनाचा रुग्ण दर आणि मृत्यू दर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. करोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पुण्यातील विधान भवन सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधीकडून सूचना जाणून घेतल्या.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कोविड-१९चा संसर्ग जिल्ह्यात किती दिवसात वाढत आहे, हे पाहून त्यादृष्टिने जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात. शासकीय यंत्रणा प्रभावी होणे आवश्यक असून आरोग्य सुविधा सक्षम करावी. करोना रुग्णांसाठी अद्याप ठोस औषध अथवा लस उपलब्ध नसल्याचे सांगतानाच अशा परिस्थितीत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. वाढता रुग्ण दर व मृत्यू दर कमी करणे हे आव्हान असून यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज आहे, असे सांगून करोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या हिताचे निर्णय घेताना सर्वांनी शासनाच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

टास्क फोर्समुळे उपाययोजनांमध्ये सुसुत्रता

राज्यात व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन ९५ मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून गरजेनुसार सबंधित भागात पुरवठा करण्यात येत आहे. महापालिकांना करोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने आर्थिक मदत देण्यात आली असून यापुढे ही मदत देण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स बनविण्याच्या सूचना दिल्या असून त्यानुसार टास्क फोर्स निर्माण होत आहेत. यामुळे कोरोना उपाययोजनामध्ये सुसुत्रता येईल.

व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन ९५ मास्कचा पुरवठा १ सप्टेंबरनंतरही केंद्राकडून करण्यात यावा, अशी विनंती पंतप्रधानांकडे केली असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, “सर्व लोकप्रतिनिधींनी देखील आपापल्या स्तरावर याबाबत विनंती करावी, जेणेकरुन राज्याला याचा लाभ होईल. करोना रुग्ण संख्येच्या परिस्थितीनुसार लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात येत आहेत. तथापि, प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 7:28 pm

Web Title: peoples representatives should act as a link between gov and people for corona control says uddhav thackeray aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “करोनामुळं राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर”
2 राज्यात सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटील यांनी केला नवा खुलासा, म्हणाले…
3 महाकाय कोविड सेंटरसाठी लवासा ताब्यात घ्या; गिरीश बापटांचा सल्ला