News Flash

पालखी प्रस्थान सोहळ्यास मंदीर परिसरात ५० लोकांच्या उपस्थितीस परवानगी

प्रस्थानावेळी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आलेल्या सर्व नागरिकांना नियमांचे पालन करणे बंधनकार

संग्रहीत छायाचित्र

श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळयास श्री क्षेत्र देहू येथुन 12 जून व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळयास श्री क्षेत्र आळंदी येथून 13 जून रोजी, मंदीर परिसराच्या आतमध्ये जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीस उपरोक्त निर्देशांचे पालन करुन परवानगी देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिली आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे व त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.  दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीच्या अनुषंगाने श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र देहु, ता. हवेली, जि. पुणे व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी, ता.खेड जि.पुणे येथुन पंढरपुरला जाण्यासाठी प्रस्थान करीत असतात. तरी, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र देहू येथुन 12 जून व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी येथुन 13 जून रोजीच्या प्रस्थान सोहळयास या दोन दिवसांसाठी परवानगी देण्यात आलेली आहे.

पुणे जिल्हयातील श्री क्षेत्र देहू व आळंदी यांचा प्रतिबंधित क्षेत्रात समावेश नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचना व निर्देशाप्रमाणे नियमावलीचे पालन करुन तसेच पालखी सोहळा प्रस्थानावेळी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आलेल्या सर्व नागरिकांनी मास्क वापरणे, स्वच्छता व निर्जंतुकीकरण इत्यादी नियमांचे पालन करुन, दोन्ही पालखी सोहळ्याच्या प्रस्थान मंदीर परिसराच्या आतमध्ये परवानगी देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी आदेशान्वये कळविले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 7:00 pm

Web Title: permission for the presence of 50 people in the temple premises for the palkhi departure ceremony msr 87 svk 88
Next Stories
1 मान्सून आला! मुंबई, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाचा अंदाज
2 यंदा भाविकांनी थेट प्रेक्षपणाद्वारेच माऊलींना सेवा अर्पित करावी : पोलीस उपायुक्त स्मिता पाटील
3 देशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पंतप्रधान मोदी जबाबदार : पृथ्वीराज चव्हाण
Just Now!
X