News Flash

ओवैसी यांच्या विरोधात पुणे न्यायालयात याचिका

प्रक्षोभक भाषणांतून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने ‘एमआयएम’ पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करून पुण्यातील दोघा युवकांनी

| February 14, 2013 11:31 am

प्रक्षोभक भाषणांतून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने ‘एमआयएम’ पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करून पुण्यातील दोघा युवकांनी पुणे न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गणेश भोकरे व वृषभ शिंगवी अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत. ओवैसी यांच्या वादग्रस्त भाषणांच्या क्लिप इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यानुसार ही याचिका दाखल करण्यात आली आहे. आपला कोणत्याही संघटनेशी संबंध नाही, मात्र भारताचा एक सुजाण नागरिक या नात्याने आम्ही ही याचिका दाखल केल्याचे भोकरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 11:31 am

Web Title: petition against akbaruddin owaisi in pune court
टॅग : Court
Next Stories
1 जादूटोणाविरोधी कायद्यासाठी अंनिसतर्फे शिवजयंतीपासून सह्य़ांची मोहीम
2 आंबा पिकविण्याच्या चुकीच्या पद्धतींबाबत अन्न व औषध विभाग जागरुकता करणार
3 ‘सार्क नॉलेज प्लॅटफॉम’ची स्थापना व्हावी – डॉ. कलाम
Just Now!
X