News Flash

कॅन्टोन्मेंटमध्ये पेट्रेल, डिझेल स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा

कॅन्टोन्मेंट विभागातील पेट्रोल पंपावरील पेट्रोल व डिझेलवर एलबीटी न आकारण्याबाबत पालिकेच्या वतीने पेट्रोलियम कंपन्यांना पत्र देण्यात आल्याने या विभागांत पेट्रोल व डिझेल स्वस्त होणार

| August 31, 2014 03:10 am

कॅन्टोन्मेंट विभागातील पेट्रोल पंपावरील पेट्रोल व डिझेलवर स्थानिक संस्था कर (एलबीटी) न आकारण्याबाबत पालिकेच्या वतीने पेट्रोलियम कंपन्यांना पत्र देण्यात आल्याने या विभागांत पेट्रोल व डिझेल स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एलबीटी हटविल्यास कॅन्टोन्मेंटमध्ये पेट्रोल सुमारे दोन रुपयांनी, तर डिझेल दीड रुपयांनी स्वस्त होऊ शकणार आहे.
पुणे पेट्रोल डिलर असोसिएशनचे प्रवक्ते व लष्कर विभागातील पेट्रोल पंपधारक अली दारुवाला यांनी याबाबतची माहिती दिली. कॅन्टोन्मेंट विभागात एलबीटी नसल्याने पेट्रोल व डिझेलवर एलबीटी न लावण्याबाबत दारुवाला यांनी सर्वात प्रथम मागणी नोंदविली होती. या मागणीबाबत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
दारुवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅन्टोन्मेंट विभागात पेट्रोल व डिझेलवर एलबीटी न घेण्याबाबत पालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी तिन्ही पेट्रोलियम कंपन्यांना पत्र दिले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर कॅन्टोन्मेंट विभागात पेट्रोल व डिझेलचे दर कमी होतील. पुणे कॅन्टोन्मेंटमध्येच नव्हे, तर या निर्णयाचा फायदा खडकी व देहूरोड कॅन्टोन्मेंट विभागातील नागरिकांनाही होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 3:10 am

Web Title: petrol and disel cheap in cantonment area
Next Stories
1 स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कार पं. विजय कोपरकर यांना जाहीर
2 ज्ञानेश्वर पादुका चौकात ब्रेक निकामी झालेल्या पीएमपीने सिग्नलचा खांब तोडून दोघांना उडविले
3 धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकावर बंदी आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीम
Just Now!
X