ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक प्रमोद मांडे यांनी काढलेल्या महाराष्ट्राबाहेरील किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन येत्या ११ ऑक्टोबरपासून बालगंघर्व कलादालनात भरविण्यात येत आहे.
मांडे यांनी महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राबाहेरील १६ राज्यातील किल्ल्यांना भेट देत त्यांची छायाचित्रे काढली आहेत. यामध्ये जम्मू-काश्मीरमधील हरिपर्वत या किल्ल्यापासून ते कन्याकुमारीजवळील वट्टकोटाई किल्ल्यापर्यंत असे अनेक अपरिचित दुर्गाचे दर्शन होणार आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर, दिल्ली, गोवा, दीव-दमण, आंध्रप्रदेश, छत्तीसगड आधी राज्यातील दुर्गसंपदा पाहण्यास मिळणार आहे.
११ ते १६ ऑक्टोबपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन ११ रोजी सकाळी १० वाजता संगणकतज्ज्ञ विजय भटकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनाच्या कालावधीत रोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत अभ्यासकांची व्याख्यानेही आयोजित केली आहेत.