तीन लाख ३९ हजार मतदारांचे छायाचित्र नाही; छायाचित्र नसल्यास नाव वगळण्याचा इशारा

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी फे ब्रुवारी महिन्यात होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे संके तस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवडमधील तब्बल तीन लाख ३९ हजार मतदारांची छायाचित्रे मतदार यादी नसल्याने संबंधित मतदारांनी त्यांचे छायाचित्र न दिल्यास त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हे मतदार महापालिका निवडणुकीतील मतदानाला मुकण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेकडून मतदार यादी अद्ययावत के ली जात आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील २१ विधानसभा मतदार संघातील तीन लाख ७९ हजार ९३३ मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नसल्याचे निवडणूक शाखेने स्पष्ट के ले आहे. संबंधित मतदारांनी तातडीने आपले छायाचित्र जमा करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

शहरातील वडगाव शेरी मतदार संघातील ७० हजार ७११, शिवाजीनगर ३० हजार ४७४, कोथरूड ४६ हजार ८८९, खडकवासला ४७ हजार ७८९, पर्वती २३ हजार ५८०, हडपसर ५० हजार २२२, पुणे कॅ न्टोन्मेंट २९ हजार ७८५ आणि कसबा पेठ मतदार संघातील १५ हजार ९०९ अशा एकू ण तीन लाख ++१५ हजार ३५९ मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नसल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले. पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड मतदार संघातील ७४७६, पिंपरी १३ हजार ५२७ आणि भोसरी मतदार संघातील ३२४६ अशा एकू ण २४ हजार २४९ मतदारांचे छायाचित्र अद्ययावत करण्यात आलेले नाही.

ग्रामीण भागातील जुन्नर विधानसभा मतदार संघातील २८, आंबेगाव १५३, खेड-आळंदी ५०३, शिरूर ११ हजार २०२, दौंड ११ हजार ५८३, इंदापूर ७११९, बारामती शून्य, पुरंदर ६१८३, भोर १५८३ आणि मावळ मतदार संघातील २२७१ जणांचे छायाचित्र मतदार यादीत नाही.

छायाचित्र कु ठे जमा करायचे?

  • वडगाव शेरी – जिल्हाधिकारी कार्यालय, बी-विंग, तिसरा मजला
  • शिवाजीनगर – अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय, अ-बरॅक, मध्यवर्ती शासकीय इमारत
  • कोथरूड – जिल्हाधिकारी कार्यालय, बी-विंग, तिसरा मजला
  • खडकवासला – हवेली तहसील कार्यालय, खडकमाळ आळी, शुक्रवार पेठ
  • पर्वती – बाबुराव सणस क्रीडांगण, सारस बागेजवळ
  • हडपसर – जिल्हा पुनर्वसन कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय किं वा हडपसर-मुंढवा, रामटेकडी-वानवडी, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय
  • पुणे कॅ न्टोन्मेंट – जिल्हाधिकारी कार्यालय, बी-विंग, तिसरा मजला
  • कसबा पेठ – जिल्हाधिकारी कार्यालय, बी-विंग, तिसरा मजला
  • पिंपरी – डॉ. हेडगेवार भवन, निगडी प्राधिकरण
  • भोसरी – जिल्हाधिकारी कार्यालय, बी-विंग, तिसरा मजला
  • चिंचवड – जिल्हाधिकारी कार्यालय, बी-विंग, तिसरा मजला

मतदार यादी पाहण्यासाठी संकेतस्थळ

मतदार यादीत नाव आहे किं वा कसे?, हे  https://www.nvsp.in/  या संके तस्थळावर समजेल. तसेच मतदार यादीत छायाचित्र जोडता न आल्यास याच संके तस्थळावर अर्ज क्र. आठ भरावा, असे आवाहन निवडणूक शाखेकडून करण्यात आले आहे.

छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या नावांची यादी  http://www.punenic.in   आणि  http://www.punecorporation.org या संके तस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.