गडचिरोली भागात गतवर्षी सात नक्षलवाद्यांना यमसदनी धाडणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा गडचिरोली येथे अकस्मात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. योगेश गुजर असं मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून ते मूळ पिंपरी-चिंचवड येथील होते. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. शनिवारी सकाळी पिंपरी भाटनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाठीमागे आई-वडील, पत्नी, दोन बहिणी आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. गतवर्षीच त्यांचा विवाह झाला होता.

त्यांच्या अकस्मात निधनाची बातमी समजल्यानंतर परिसरात शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव शनिवारी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास पिंपरी-चिंचवड येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लोकांनी गर्दी केली होती. योगेश गुजर यांची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख होती. सुरवातीला दोन वर्षे सैन्य दलात सेवा केल्यानंतर पोलीस दलात कार्यरत झाले होते.

Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
Fraud with trader dhule
पंजाबचा व्यापारी अन धुळ्याचे पोलीस
navi mumbai municipal corporation to open wetlands for residential complexes zws
पाणथळ जमिनींवर निवासी संकुले! नवी मुंबईत पामबीचलगत फ्लेमिंगो अधिवास धोक्यात
Rashmi Shukla
पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही चित्रीकरणाबाबत काळजी घ्या; महासंचालकांचे आदेश

एक वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. योगेश यांचे वडील सैन्यदलात सुभेदार पदावर सेवेत होते. योगेश यांचे शिक्षण खडकीतील बी.जे.स्कुल मध्ये झाले असून २००८ पासुन ते चिंचवड येथील समर्थ कॉलनीमध्ये रहात होते. २०१३ च्या बॅचमध्ये ते उत्तीर्ण होऊन पोलीस दलात दाखल झाले. त्यांनी गतवर्षी सात नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवले होते. ते नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी नेहमी तत्पर असायचे .मात्र त्यांच्या अकस्मात मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला असून दुःखाचा डोंगर कोसळला आहे.