दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि बालकलाकार सोमनाथ अवघडे यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता होण्याची संधी देणारा ‘फॅन्ड्री’, सवरेत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट ठरलेला ‘आजचा दिवस माझा’, प्रेक्षक आणि समीक्षकांनी गौरविलेला ‘नारबाची वाडी’, राष्ट्रीय पुरस्कारामध्ये विशेष मानकरी ठरलेला ‘यलो’, धाडसी विषयाच्या वैशिष्टय़पूर्ण हाताळणीने गाजलेला ‘रेगे’, ‘अवताराची गोष्ट’ आणि उत्पन्नाचे नवे विक्रम प्रस्थापित करणारा ‘दुनियादारी’ असे सात चित्रपट रसिकांना शुक्रवारपासून (९ मे) मोफत पाहण्याची पर्वणी लाभणार आहे.
संवाद पुणे संस्थेतर्फे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुणे विभाग यांच्या सहकार्याने यंदापासून ‘पुण्यहिरकणी कलागौरव’ पुरस्कार सुरू करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ९ ते १५ मे या कालावधीत ‘पुण्यहिरकणी चित्रपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. विजय चित्रपटगृह येथे दररोज सकाळी दहा वाजता हा महोत्सव होणार असून पुणेकर रसिकांसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विनाशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, दिग्दर्शक कांचन नायक, केदार असोसिएट्सचे संचालक सूर्यकांत निकम आणि दिलीप निकम उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सुनील महाजन आणि मेघराज राजेभोसले यांनी मंगळवारी दिली.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Marathi dancer ashish patil will work with Sanjay Leela Bhansali
‘या’ मराठमोळ्या नृत्यदिग्दर्शकाला मिळाली संजय लीला भन्साळींबरोबर काम करण्याची संधी; म्हणाला, “माझे अश्रू अनावर…”
Mumbai Court refuses to stay release of Maidaan
अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटावर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!