तीन वर्षांच्या मुलीच्या श्वासनलिके त अडकलेला काचेचा तुकडा शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे. श्वास घेण्यास त्रास आणि थुंकीमधून रक्त येत असल्याने तपासण्या के ल्या असता श्वास नलिके त अपारदर्शक घटक अडकल्याचे दिसून आले. शस्त्रक्रियेनंतर हा तुकडा म्हणजे काच असल्याचे स्पष्ट झाले.

बालरोग शल्यचिकित्सा तज्ज्ञ डॉ. अभिजित बेणारे म्हणाले, रिजिड ब्राँकोस्कोपी या तपासणीतून श्वसन नलिके त एक नळी घालण्यात आली. त्याला बसवलेल्या फोर्सेप उपकरणाद्वारे हा तुकडा बाहेर काढण्यात आला. रक्ताने माखलेला हा तुकडा स्वच्छ केल्यानंतर ती काच असल्याचे स्पष्ट झाले.

बालरोगतज्ज्ञ डॉ. उमेश वैद्य म्हणाले, श्वासनलिके त अडकलेला घटक काच असल्यामुळे ही शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते. लहान मुलांचा श्वसनमार्ग अरुंद असतो, तसेच कोणत्याही अडथळ्यांपासून संरक्षण करणारी संस्था पूर्ण विकसित झालेली नसते. काचेमुळे झालेला रक्तस्रााव थुंकीवाटे बाहेर येत होता. तसेच तुकडा काढताना कोणतीही इजा होऊ नये म्हणून अत्यंत सावधगिरीने शस्त्रक्रिया पार पाडणे आवश्यक होते. मुलीला काही दिवस लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात ठेवले. शस्त्रक्रियेनंतर सूज येणे किं वा रक्तस्रााव होणे शक्य असते, मात्र जखम बरी झाली की काळजीचे कारण नाही, असेही डॉ. वैद्य यांनी स्पष्ट केले. लहान मुलांच्या भूलतज्ज्ञ डॉ. राजश्री गोडबोले हे शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या संघात होते.