News Flash

पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे करोनामुळे निधन

करोना महामारीत अनेकांना केली होती मदत; काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात सुरू होते उपचार

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आणि महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पहिल्यांदा करोना विषाणूची सौम्य लक्षण होती. मात्र, त्यांनानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक आणि महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांनी करोना विषाणुच्या संकट काळात अनेक नागरिकांना मदत केली होती. अनेक गरीब आणि गरजू व्यक्तींना त्यांनी धान्य वाटप केले. दरम्यान, त्यांना २५ जून रोजी करोना विषाणुची बाधा झाल्याचं स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

चिखली येथून ते तीन वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आले होते. महानगर पालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदाची धुरा सांभाळताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असायचे. कचरा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी चक्क महानगर पालिकेच्या मुख्य दालनात कचरा आणून टाकला होता. ते संबंध लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते निकटवर्तीय समजले जात. या घटनेमुळे साने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 9:40 am

Web Title: pimpari chinchwad ncp corporator datta sane dies due to corona msr 87 kjp 91
Next Stories
1 शास्त्रीय संगीताचे मूळ तत्त्व कायम राहायला हवे!
2 करोना चाचणीसाठी आता डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही
3 “करोनाची साथ आटोक्यात का नाही? पुण्यात चाचण्यांसाठी आता IAS अधिकारी नेमा”
Just Now!
X