News Flash

भरधाव वेगातील कार रस्त्यातच पेटली

सुदैवाने जीवितहानी टळली, पिंपरी येथील घटना

भरधाव वेगात असलेल्या ‘ऑडी’ने भर रस्त्यातच अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेत ही लाखमोलाची कार अक्षरशा जळून खाक झाली. सुदैवाने कारचे मालक अनिल भारती हे वेळीच कारमधून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी होत आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे कारने पेट घेतला असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, अनिल भारती हे त्यांच्या कार (क्रमांक एम.एच-१२ एच.एल-३००) द्वारे पिंपरीच्या दिशेने येत होते. दरम्यान, ऑटो क्लस्टरच्या समोरून कार जात असताना अचानक कारच्या समोरच्या भागातून धूर निघाला व काही क्षणातच कारने पेट घेतला. हे पाहून कार चालक अनिल भारती हे तात्काळ कारच्या बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

अवघ्या काही मिनिटांत कार पूर्णपणे जळाली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. परंतु तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी २० मिनिटांत आग आटोक्यात आणली. गोविंद सरवदे यांच्यासह हनुमंत होके, विजय घुगे आणि संभाजी दराडे या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 10:01 pm

Web Title: pimpari the car was burnt in the road msr 87
Next Stories
1 पंतप्रधान मोदींनी घेतली अरूण शौरी यांची भेट
2 पोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर राहणार : केंद्रीय गृह राज्यमंत्री
3 भारताला तक्षशिला ते नालंदा असा उज्ज्वल शैक्षणिक वारसा -उपराष्ट्रपती
Just Now!
X