24 October 2020

News Flash

पुणे : तरुणीची आत्महत्या, प्रियकराला पाठवलेल्या शेवटच्या मेसेजमध्ये म्हणाली…

प्रियकरा विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

तरुणाने प्रेमात धोका दिल्यामुळे चाकण परिसरात एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आहे.  आत्महत्येपूर्वी तरुणीने प्रियकराला एक मॅसेज केला असून त्यात “माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलंस, मी आत्महत्या करत आहे”, असं म्हटलं आहे. या प्रकरणी तरुणावर आत्महत्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण येथील २८ वर्षीय मुलीनं गेल्या महिन्यात प्रियकराचं नाव लिहून आत्महत्या केली आहे. तब्बल महिनाभरानंतर मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण परिसरात 22 सप्टेंबर रोजी एका तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान, ही आत्महत्या प्रेमात प्रियकराने धोका दिल्याने केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी एका खासगी कंपनीत काम करत होती. तसेच तिचे लग्न झालेले असून तिने पाच वर्षे संसार करून पती सोबत पटत नसल्याने घटस्पोट घेतला होता. त्यानंतर ती आई वडील यांच्या सोबत न राहात स्वतंत्र राहायची. खासगी कंपनीत काम करून ती स्वतः चा उदरनिर्वाह भागवत होती.

दरम्यान, एका तरुणाशी तिचे प्रेम संबंध होते. त्यांना लग्न करायचे होते. परंतु, मुलानं नकार दिला असं फिर्यादीत मुलीच्या आई ने म्हटले आहे. गेल्या महिन्यात मुलीने आपल्या प्रियकराच्या मोबाईलवर “मी आत्महत्या करत आहे. माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलंस, your time is over now…I am doing suicide by by…! असा टेक्स्ट मॅसेज करून आत्महत्येच टोकाचं पाऊल उचलले. या घटने प्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश धस हे अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 1:26 pm

Web Title: pimpri chinchiawad girl sicude who faildes in love nck 90 kjp 91
Next Stories
1 आम्ही दिलदार आहोत : सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटलांना टोला
2 पुणे महापालिकेने ‘त्या’ कामावर लक्ष द्यायला पाहिजे होते : अजित पवार
3 पुणे : सुरक्षारक्षकांचे कपडे घालून चोरांनी ATM मशीनवर मारला डल्ला
Just Now!
X