News Flash

पिंपरीत १४ वर्षांच्या मुलीवर पित्याचा बलात्कार, शेजारी राहणाऱ्या महिलेमुळे फुटली वाचा

पत्नी घराबाहेर गेल्यावर नराधम पिता स्वत:च्याच १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करायचा. गेल्या सात महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता.

संग्रहित छायाचित्र

पिंपरी चिंचवडमधील भोसरी येथे नराधम पित्याने स्वत:च्या १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली. शेजारी राहणाऱ्या महिलेने त्या मुलीला विश्वासात घेऊन तिला बोलते केले आणि नराधम पित्याच्या अत्याचारांना वाचा फुटली.

पिंपरी- चिंचवडच्या भोसरीत पीडित मुलगी राहते. पती, पत्नी, मुलगा आणि दोन मुली असे हे कुटुंब आहे. घरातील परिस्थिती आर्थिक बेताची असल्याने पीडित मुलीची आई ही धुणी भांडी करते. तर पीडित मुलगी नववी इयत्तेत शिकते. तर तिचे वडील बेरोजगार आहेत. पत्नी घराबाहेर गेल्यावर नराधम पिता स्वत:च्याच १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करायचा. गेल्या सात महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता.

काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या आई – वडिलांमध्ये वाद झाला. पतीने पत्नीला घराबाहेर घेण्यास सांगितले. मात्र, मुलीने घरातच थांबावे, असे त्या नराधमाचे म्हणणे होते. शेजारी राहणाऱ्या महिलेला या प्रकारावर संशय आला. तिने मुलीच्या आईकडे विचारणा देखील केली. मात्र, तिच्या आईला काहीच माहिती नव्हती. अखेर त्या महिलेने मुलीला गाठले आणि तिला विश्वासात घेऊन तिला बोलते केले. वडिलांनीच मुलीवर अत्याचार केल्याचे ऐकून शेजारी राहणाऱ्या महिलेलाही धक्का बसला. ‘या घटनेची वाच्यता केल्यास विष देऊन ठार मारु’ अशी धमकी त्या नराधमाने मुलीला दिली होती. म्हणून मुलीने सात महिने वडिलांचे अत्याचार सहन केले. अखेर शेजारी राहणाऱ्या महिलेने तिला मदत केली. त्या महिलेने मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी अद्याप नराधम पित्याला अटक करण्यात आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 2:06 pm

Web Title: pimpri chinchwad 14 year girl raped by father in bhosari
Next Stories
1 नवे रेल्वे टर्मिनस कधी?
2 लोकजागर : पीएमपीची लक्तरे
3 प्रेरणा : ज्ञानदानाची तळमळ
Just Now!
X