News Flash

पिंपरी चिंचवडमध्ये गुंडांची दहशत! दिसेल त्याच्यावर केले कोयत्याने वार

यातील एक आरोपी हा वाहनांना थांबवायचा आणि दुसरा कोयत्याने बेफिकीरपणे वार करत होता

PCMC Attack
ये-जा करणाऱ्या गाड्यांवर हल्ला करणाऱ्या या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे निलख परिसरातील एक थरारक व्हिडिओ समोर आला असून दोन गुंड दारूच्या नशेत रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर कोयत्याने वार करत असल्याचं समोर आलं आहे. यात एक गुंड वाहनांना थांबवतो तर दुसरा कोयत्याने वार करतो असं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

अशा एकूण दहा वाहनांवर त्यांनी कोयत्याने वार केले आहेत. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याच दिवशी या गुंडांनी पैशांसाठी एका व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे या प्रकरणीही त्यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिक संतोष खरात आणि चेतन जावरे अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतिक संतोष खरात आणि चेतन जावरे यांनी पिंपळे निलख भागातील मुख्य रस्त्यावर उतरून दारूच्या नशेत ये-जा करणाऱ्या वाहनांवर कोयत्याने हल्ला चढवला. यातील एक आरोपी हा वाहनांना थांबवायचा आणि दुसरा कोयत्याने बेफिकीरपणे वार करत होता. काही दुचाकी चालक जखमी होण्यापासून बचावले आहेत. तर चारचाकी वाहनांचे आरोपींनी नुकसान केले आहे.

हेही वाचा- इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन

या गंभीर घटनेमुळे परिसरात आणि रस्त्यावर भीती पसरली होती. वाहन थांबवून नागरिक आरोपींची गुंडगिरी पाहत होते. या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2021 9:47 am

Web Title: pimpri chinchwad 2 men attacking on the cars going from the road vsk 98 kjp 91
Next Stories
1 कोथिंबीर, मेथीच्या दरात घट
2 इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन
3 पावसाची दडी, घामाच्या धारा
Just Now!
X