पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी गायीला जीवनदान दिल्याची. आज दुपारी इमारतीच्या शेजारी असणाऱ्या रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या खड्ड्यात गाय अडकली होती. त्यानंतर दोन्ही शहरातील अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत गायीला सुखरूप बाहेर काढले आहे. ही घटना पिंपरी-चिंचवड शहरातील बोपखेल येथे घडली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बोपखेल गणेश नगर येथे वॉटर हार्वेस्टिंगच्या खड्ड्यात गाय पडली होती. खड्डा अरुंद असल्याने गायीला हलता येत नव्हते. याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली. खड्ड्यातील लोखंडी गज कापून गायीला तब्बल दीड तासांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. कोणालाही आश्चर्य वाटेल अशा छोट्या खड्ड्यात गाय अडकली होती. परंतु, अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न करत गायीला सुखरूप बाहेर काढले.

यावेळी पुण्यातील येरवडा अग्निशमन आणि पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धाव घेतली होती.  अधिकारी सुभाष जाधव, तानाजी आंबेकर, हनुमंत चकोर (चालक), रतन राऊत आणि  केशव घुडंरे आदींनी मतदकार्य केले.