News Flash

पिंपरी-चिंचवड : … अन् संतापलेल्या सुरक्षा रक्षकाने केली १३ रिक्षांची तोडफोड!

वाकड पोलिसांनी केली अटक ; जाणून घ्या काय आहे नेमकं कारण

आपण स्वतः रिक्षा फोडल्या असल्याची कबुली देखील आरोपीने पोलिसांना दिली आहे

पिंपरी-चिंचवडमध्ये एका कॉम्प्लेक्स समोर उभा असलेल्या रिक्षांची एका सुरक्षा रक्षकाने मोठ्याप्रमाणात तोडफोड केल्याची घटना समोर आले आहे. या घटनेत रिक्षांच्या काचा फोडण्यात आल्याने जवळपास १३ रिक्षा चालकांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरूवारी मध्यरात्री घडली याप्रकरणी सुरक्षा रक्षक किरण घाडगे याला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरातील म्हातोबानगर येथे नवीन कॉम्प्लेक्स बांधण्यात आले असून त्याच्या समोर तेथील काही रिक्षा चालक वारंवार बजावून देखील रिक्षा उभी करतात. याशिवाय त्यातील काहीजण त्या ठिकाणी लघुशंका देखील करायचे असं आरोपी सुरक्षा रक्षक किरण घाडगे याचे म्हणणे आहे.

तर, याचाच राग मनात धरून मध्यरात्री आरोपी सुरक्षा रक्षक घाडगे याने मद्यपान करून कॉम्प्लेक्स समोर उभा करण्यात आलेल्या रिक्षा दगडाने फोडून नुकसान केले. यात १३ रिक्षांच्या काचा फोडल्या असून वाकड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच, कॉम्प्लेक्ससमोर रिक्षा उभ्या केल्या असल्याने आपण स्वतः रिक्षा फोडल्या असल्याची कबुली देखील त्याने पोलिसांना दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 2:28 pm

Web Title: pimpri chinchwad an angry security guard vandalized 13 rickshaws msr 87 kjp 91
Next Stories
1 My Safe Pune: गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांचा अभिनव उपक्रम
2 शरद पवार – प्रशांत किशोर भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
3 पुणेकरांना दिलासा पण…; मॉल्स उघडणार, दुकानं ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय
Just Now!
X