06 August 2020

News Flash

पिंपरीत व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या

प्रभात कॉलनी रोड परिसरात राहणारे अनिलकुमार रघुनाथराव धोत्रे (वय ४४) यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून त्यांचा काळेवाडीतील पाचपीर चौकात कार्यालय आहे.

प्रभात कॉलनी रोड परिसरात राहणारे अनिलकुमार रघुनाथराव धोत्रे (वय ४४) यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय.

पिंपरी- चिंचवडमधील राहटणी येथे व्यावसायिकाची दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. लुटीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा संशय आहे.

प्रभात कॉलनी रोड परिसरात राहणारे अनिलकुमार रघुनाथराव धोत्रे (वय ४४) यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून त्यांचा काळेवाडीतील पाचपीर चौकात कार्यालय आहे. सोमवारी रात्री दररोज प्रमाणे ते दुकान बंद करून ते घरी जात होते. अनिलकुमार हे दररोज व्यवयासातून मिळणारे पैसे घरी घेऊन जायचे. सोमवारी त्यांच्याकडील काळ्या बॅगेत १ लाख ९६ हजार रुपये होते. घरापासून काही अंतरावर असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांना हटकले आणि त्यांच्याकडील बॅग घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र याला अनिलकुमार यांनी प्रतिकार केला. यानंतर एका हल्लेखोराने अनिलकुमार यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात अनिलकुमार यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालाय या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील पिंजन हे करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2018 9:39 am

Web Title: pimpri chinchwad businessman killed by unknown persons
Next Stories
1 आकाशवाणी बातम्यांच्या प्रसारणाला ९१ वर्षे पूर्ण
2 पीएच.डी. प्रबंधातून स्टार्टअप साकारले!
3 क्रांतिकारकांच्या स्मृतीतून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल- मुख्यमंत्री
Just Now!
X