News Flash

पिंपरी-चिंचवड : विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची पोलिसांकडून करोना टेस्ट

अनेकजण पॉझिटिव्ह आढळून आल्याचेही समोर

पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाउनमध्येही विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची पोलीस थेट करोना टेस्ट करत असून, अनेकजण पॉजिटिव्ह आढळून आल्याने, पोलिसांकडून त्यांच्या हातवार होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जात आहे. तर, ज्यांना प्रादुर्भाव जास्त आहे त्यांना रुग्णालयात भरती केली जात आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे यांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ब्रेक द चेन या मोहिमेतंर्गत नियम कडक करण्यात आले असून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची करोना टेस्ट केली जात आहे. गंभीर बाब म्हणजे यात अनेकजण पॉझिटिव्ह आढळत आहेत.

नागरिकांना त्याच्या आसपास फिरणाऱ्या व्यक्तींपासून करोनाचा धोका असू शकतो, असं सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं प्रत्येक नागरिकाने सोशल डिस्टसिंग आणि मास्क वापरून करोनापासून स्वतःचा बचाव केला पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि नियमांचं पालन करावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे हे देखील उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 6:05 pm

Web Title: pimpri chinchwad corona test by the police for wandering citizens without any reason msr 87 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुणे: फेसबुकवरील मित्राच्या नादात महिलेने २५ बँकांच्या ६७ खात्यात ४ कोटी जमा केले; पोलीसही चक्रावले
2 पुण्यातील देवदूत! करोना रुग्णांना रुग्णालयापर्यंत मोफत रिक्षा प्रवास; तरुणांचा कौतुकास्पद उपक्रम
3 करोनाच्या प्रादुर्भावामुळे नेट परीक्षा लांबणीवर
Just Now!
X