News Flash

पिंपरी-चिंचवड पालिकेतील अधिकाऱ्यांच्या कामातील अकार्यक्षमता उघड

दिव्यांग नागरिक दुर्लक्षित

पिंपरी-चिंचवड पालिकेतील अधिकाऱ्यांच्या कामातील अकार्यक्षमता उघड
विविध मागण्यांसाठी दिव्यांग नागरिकांनी पालिकाभवनात ठिय्या आंदोलन केले.

देशातीलच नव्हे तर आशियातील श्रीमंत महापालिका अशी ओळख असणाऱ्या पालिकेतील अधिकाऱ्यांच्या कामातील ‘गरिबी’ समोर येत आहे. पालिकेतीलअधिकारी दिव्यांग नागरिकांना वेळ देत नसल्याचे समोर आले आहे. दिव्यांग नागरिकांनी आपल्या समस्येसाठी अधिकाऱ्यांडे दाद मागितल्यास त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेकडे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांग नागरिकांनी मंगळवारी महापालिका भवनामध्ये ठिय्या आंदोलन केले. प्रसारमाध्यमांनी दिव्यांगांची दखल घेतल्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यांनंतर त्यांनी दिव्यांगाच्या ठिय्या आंदोलनाकडे धाव घेतली. दिव्यांग नागरीकांसाठी सरसकट दोन हजार रुपये पेन्शन, घरकूल योजना, अशा मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग नागरिक पालिकेतील अधिकाऱ्यांना वेळ मागत आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी आयुक्तांची बैठक घेण्यात यावी, अशी मागणी त्यांना करायची आहे. अधिकारी दाद देत नसल्यामुळे अखेर या नागरिकांनी एकत्र जमून पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली.

माध्यामांनी दिव्यांगांची दखल घेताच अधिकाऱ्यांनी दिव्यांगाना वेळ दिला. आयुक्तांशी बोलून बैठकीचे आयोजन लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून दिव्यांग नागरिकांना देण्यात आले. महापालिका भवनामध्ये अधिकारी दिव्यांग नागरिकांनाच जर अशी वागणूक देत असतील तर सर्व सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2017 4:41 pm

Web Title: pimpri chinchwad corporation officer ignore handicapped citizen problem
Next Stories
1 तुकाराम साहेब जागे व्हा! बससेवा सुरु करण्यासाठी विद्यार्थी पालिकेच्या दारी
2 ..तरीही विद्यापीठ चांगले!
3 स्वारगेट एसटी स्थानकात धूसर चित्रीकरण
Just Now!
X