13 November 2019

News Flash

पुणे: अंगावर लघुशंका केल्याचा जाब विचारला, कोयत्याने केले वार

अंगावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याने सराईत गुन्हेगाराने कोयत्याने वार केले.

अंगावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याने सराईत गुन्हेगाराने कोयत्याने वार केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. या घटनेत ५८ वर्षीय शिवमूर्ती एकनाथ जाकते हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सराईत गुन्हेगार विकी उर्फ विकास आडागळे याच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शिवमूर्ती एकनाथ जाकते हे घरासमोरील दुकानशेजारी झोपले होते. तेव्हा, मध्यरात्री अचानक येऊन आरोपी विकी याने त्यांच्या अंगावर लघुशंका केली. त्याचा जाब जखमी शिवमूर्ती यांनी विचारला असता. त्याचा राग मनात धरून आरोपी विकीने तुला तर आता जीवे मारून टाकतो अशी धमकी देऊन सोबत असलेल्या लोखंडी कोयत्याने त्यांच्या डोक्यात, हातावर, वार केले.

शिवमूर्ती हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी मात्र फरार असून त्याचा शोध वाकड पोलिस घेत आहेत. याप्रकरणी जखमी यांचा मुलगा किरण शिवमूर्ती जातके यांनी फिर्याद दिली आहे.

First Published on June 18, 2019 9:39 pm

Web Title: pimpri chinchwad crime attack on person