28 February 2021

News Flash

पुणे : दारूची नशा भोवली, बालपणीच्या मित्रानेच केला मित्राचा खून

दारुच्या नशेत बालपणीचे मित्र एकमेकांच्या जीवावर उठले, दारूने घात केला आणि त्यांनी एकमेकांची मैत्री कायमची गमावली. 

(मृत - सनी घोटवकर )

बालपणीच्या मित्राने आपल्याच मित्राचा दारूच्या नशेत दगडाने ठेचून खून केल्याची घटना आज(दि.१६) सकाळी पिंपरी-चिंचवडच्या चिखली परिसरात उघडकीस आली आहे. दारू किती वाईट असते याचा प्रत्येय या घटनेतून येतोय. लहानपणीच्या मित्रांना दारूने कायमचे दूर केले आहे. सनी घाटोळकर (वय-२२) आणि प्रतीक उर्फ सोन्या संजय मोरे (वय-२०) अशी मयत आणि आरोपी मित्रांची नावे आहेत. दोघांवरही गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितले. आरोपीचा शोध चिखली पोलीस घेत आहेत. याप्रकरणी शुभम घाटोळकर याने चिखली पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सनी घाटोळकर आणि आरोपी मित्र प्रतीक उर्फ सोन्या संजय मोरे हे दोघे बालपणीचे मित्र होते. बुधवारी ते दिवसभर सोबत फिरले, रात्री देखील सोबत होते. रात्री सोबत दारू प्यायली आणि शरद नगर येथील गल्लीत येईपर्यंत दोघांनाही दारूची नशा चांगलीच चढली होती. दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले. दोघे एकमेकांना दगड मारत होते. हा वाद एवढा विकोपाला गेला की, मयत व्यक्तीच्या अंगावर बसून आरोपी मित्र प्रतीकेने त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला.

दोघेही नेहमी सोबत असायचे आणि जीवाला जीव लावणारे मित्र होते. दारुच्या नशेत तेच मित्र एकमेकांच्या जीवावर उठले. दारूने घात केला आणि त्यांनी एकमेकांची मैत्री कायमची गमावली. मयत सनी घाटोळकर याच्यावर मारहाण करून लूटमार केल्याचा गुन्हा दाखल आहे. तर आरोपी मित्र प्रतिकवर मुलीची छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितल आहे. घटने प्रकरणी प्रतीकचा शोध चिखली पोलीस घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2019 4:43 pm

Web Title: pimpri chinchwad crime drunk guy murders close friend
Next Stories
1 पुण्यात शनिवार पेठेत इमारतीला आग, मेडिकलचे दुकान खाक
2 ‘कांचनगंगा’वर जागतिक विक्रमाची मराठी मुद्रा!
3 चार महिन्यांत वीस पादचाऱ्यांचा अपघाती मृत्यू
Just Now!
X