20 November 2019

News Flash

 पिंपरी-चिंचवड : पत्नीचा खून करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

मयत भोसले दांपत्याला दोन मुलं असून एकाचा विवाह झाला आहे. तर एक सोबत राहतो .

पिंपरी-चिंचवडच्या चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पतीने पत्नीचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजेंद्र भोसले वय-५५ असे आरोपी पतीचे नाव असून संगीता भोसले वय- ४८ असे खून केलेल्या पत्नीचे नाव आहे. त्यांच्यात नेहमीच किरकोळ भांडण होत असल्याचं सांगण्यात येत असून शनिवारी(दि.२५)  ही घटना घडली.  घटनेचा अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखलीच्या कृष्णानगर येथे अरुणा अपार्टमेंट आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास राजेंद्र भोसले यांनी आपल्या पत्नीच्या हाताची नस कापून खून केला. त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यानंतर स्वतः फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत भोसले दाम्पत्याला दोन मुलं असून एकाचा विवाह झाला आहे. तर एक सोबत राहतो असं पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, आतील बेडरूममध्ये मयत पती पत्नीची झटापट झाली. राजेंद्र यांनी संगीता यांच्या हाताची नस कापली. त्या रक्ताच्या थारोळ्यात मुख्य दरवाजापर्यंत आल्या. दरवाजा उघडून लोखडी गेटमधून वरच्या मजल्यावर राहणाऱ्या मुलाला मदतीची याचना केली. तो धावत आला आणि पाठीमागील दरवाजा उघडून आत प्रवेश करत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, संगीता यांचा मृत्यू झाला होता. तोपर्यंत दुसरीकडे आतील बेडरूममध्ये राजेंद्र यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. घटनेचं मुख्य कारण अद्याप समजलं नसून त्याचा तपास चिखली पोलीस करत आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक आहेर, पोलीस उपनिरीक्षक उत्तम ओमबासे आणि पोलीस कर्मचारी नाणेकर हे दाखल झाले होते.

First Published on May 26, 2019 9:52 am

Web Title: pimpri chinchwad crime husband kills wife then hang himself
Just Now!
X