News Flash

पिंपरी चिंचवड : KYC च्या नावाखाली तरुणीचे दीड लाख लुटले; QR Code, Links च्या माध्यमातून फसवणुकीत वाढ

फोनवरुन एखाद्या कंपनीच्या नावाने बँक खात्यांसंदर्भात माहिती विचारली जात असेल तर साधव राहणे गरजेचे आहे. अशाप्रकारचा फोन आल्यास बँकेशी संपर्क करणे फायद्याचे ठरते

मागील काही दिवसांपासून सातत्याने यासंदर्भातील तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत आहे. (प्रातिनिधिक फोटो)

पिंपरी-चिंचवडमध्ये केवायसी अपडेट करून देतो असे म्हणून एका तरुणीला दीड लाखांचा गंडा घालण्यात आलाय. गेल्या काही महिन्यांपासून क्यूआर कोड, अनोळखी लिंक, ऍप डाऊनलोड करायला सांगून आर्थिक फसवणूक अश्या घटना घडत आहेत. अशी माहिती सायबर पोलीस निरीक्षक तुंगार यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी बोलताना दिलीय.

गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांची संख्या वाढली असून क्यूआर कोड स्कॅन करायला लावणे, अनोळखी लिंकवर क्लिक केल्यास आर्थिक फसवणूक होणे, अ‍ॅपद्वारे फसवणूक अशा दररोज दहा ते बारा तक्रारी येत असल्याची माहिती तुंगार यांनी दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना यात सतर्क राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> WhatsApp वर येणाऱ्या ‘या’ लिंकवर क्लिक करू नका; सायबर पोलिसांचं आवाहन

केवायसी अपडेट करून देतो असे म्हणून एका तरुणीची दीड लाखांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली. तरुणीला अज्ञात व्यक्तीने फोन करून केवायसी अपडेट करून देतो असे सांगितले, त्या तरुणीने सर्व बँक डिटेल्स दिल्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये तिच्या बँक खात्यातील रक्कम सायबर गुन्हेगारांनी लंपास केल्याचं तुंगार यांनी म्हटलं आहे. बँक फोन करून केवायसीबद्दल विचारत नाहीत. नागरिकांनी फोनवरुन अशी माहिती देऊ नये. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका असं आवाहन तुंगार यांनी केले आहे.

नक्की पाहा >> फोन उचलल्यावर खरंच पैसे कट होतात का?; जाणून घ्या फ्रॉड कॉल्सपासून सुरक्षित राहण्यासंदर्भातील १० टीप्स

फसवणूक कशी होते?

ऑनलाईन मद्य मागविणे, अनोळखी व्यक्तीने क्यूआर कोड स्कॅन करायला लावणे, अनोळखी व्यक्तीने पाठवलेली लिंक क्लीक करणे, केवायसी अपडेट करायला सांगणे, दररोज अश्या प्रकारच्या दहा ते बारा तक्रारी येत आहेत. अज्ञात सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या कारणावरून फोन करू शकतो असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे फोनवरुन एखाद्या कंपनीच्या नावाने बँक खात्यांसंदर्भात माहिती विचारली जात असेल तर साधव राहणे गरजेचे आहे. अशाप्रकारचा फोन आल्यास फोनवरुन माहिती देण्याऐवजी बँकेमध्ये प्रत्यक्ष जाऊन चौकशी करणं फायद्याचं ठरतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 3:53 pm

Web Title: pimpri chinchwad cyber crime kyc fraud women duped of one and half lakh kjp 91 scsg 91
टॅग : Pimpri Chinchwad
Next Stories
1 “वाघ आता पिंजऱ्यातला झालाय, आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती”, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला!
2 सात पाठ्यवृत्तींना ‘यूजीसी’कडून ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3 ‘स्वच्छ’सह सामाजिक प्रारूपावरही घाला
Just Now!
X