21 January 2021

News Flash

देहूरोड: दारुच्या व्यसनामुळे पत्नी सोडून गेली; नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

याआधी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता

अपमानित झालेल्या कॅब चालकाने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना चेन्नईत घडली.

दारुच्या व्यसनामुळे पत्नी सोडून गेल्याने निराश झालेल्या देहुरोड येथील एका तरुणाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात गंभीर भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. विक्रम जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. देहूरोड येथील नवनाथ कॉलनीत तो राहत होता. याआधी दोन वेळा या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव कुटुंबीय अनेक वर्षांपासून देहूरोड येथील विकासनगर भागात राहत होते. विक्रम जाधव हा रंगकाम करत होता. काम बंद झाल्याने त्याला दारुचे व्यसन जडले होते. दारुच्या व्यसनामुळे विक्रमची पत्नी त्याला सोडून गेली होती. दारुचे व्यसन आणि पत्नी सोडून गेल्याने तो गेल्या अनेक दिवसांपासून निराश होता. यातूनच यापूर्वी त्याने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. विषारी औषध पिऊन त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तर दुसऱ्यांदा त्याने स्वतःला पेटवून घेतले होते. मात्र, त्यावेळी बचावला होता. यावेळीही त्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. गंभीर भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यशवंत स्मृती रुग्णालयात त्याचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2017 6:57 pm

Web Title: pimpri chinchwad dehuroad youth set ablaze himself
Next Stories
1 पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी
2 पिंपरीत दुकानात चोरी, २.३१ लाखांचे मोबाईल लंपास
3 कुलभूषण जाधव प्रकरण: ‘ट्रम्प’कार्डने पाकिस्तानची खेळी उलटवता येईल: उज्ज्वल निकम
Just Now!
X